जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीची उद्या होणार निवड
कोण होणार उपसभापती याकडे तालुक्याचे लक्ष
सव्वा दोन वर्षांपूर्वी झालेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपा नऊ जागा व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागा समसमान जागा निवडून आल्याने ईश्वर चिट्टीद्वारे सभापती पदी भाजपाचे शरद कार्ले तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस राळेभात गटाचे कैलास वराट यांची निवड झाली होती.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन संचालक भाजपाच्या गळाला लागले यामुळे उपसभापती कैलास वराट यांचे पद धोक्यात आले. ३० जून २०२५ रोजी बारा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला यानुसार १० जुलै रोजी १२ विरुद्ध ०० मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आता उपसभापतीची निवड उद्या सोमवारी दि. ११ आँगस्ट रोजी होत आहे.
जुन्या भाजपा सदस्याला संधी मिळणार कि, नविन सदस्यांना संधी मिळणार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे कोणाला संधी देणार हे उद्याच कळेल.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड, तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जामखेड यांचे दिनांक २९-०७-२०२५ रोजीच्या पत्रानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड, जिल्हा अहिल्यानगरची उपसभापती निवडीची सभा माननीय दिलीप तिजोरे अध्यासी अधिकारी कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांचे अध्यक्षतेखाली वार सोमवार दिनांक ११-०८-२०२५ रोजीसकाळी ठिक ११:०० वाजता बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत केली असुन सदर सभेसाठी आपण उपस्थितराहावे हि विनंती.
१ नामनिर्देशन पत्र वाटप व स्विकृती सकाळी ११:०० ते ११:३०
२ नामनिर्देशन पत्र छाननी दुपारी ११:४५ ते दुपारी १२:००:
३वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्द करणे तसेच (निवडणुकीची आवश्यकता नसल्यास निकाल घोषीत करणे) दुपारी दुपारी १२:१०
४ नामनिर्देशन पत्र माघार दुपारी १२:१० ते १२:३०
५ अंतिम उमेदवाराची यादी जाहिर करणे दुपारी १२:३० वाजता
६ मतदान प्रक्रिया दुपारी १ ते १.३०
७ मतमोजणी प्रक्रिया मतदाना नंतर लगेचमतमोजणी नंतर लगेच
८ निवडुन आलेल्या पदाधिकारी बाबत निकाल घोषीत करणे टिप:- सदर निवडणुक कार्यक्रमातील वेळेचे फेरबदल करण्याचे अधिकार मा. अध्यासी अधिकारी यांना राहतील.
कोण होणार उपसभापती यांची उत्कंठा जामखेड करांना लागली आहे. सचिन घुमरे, नंदुआबा गोरे, डॉ गणेश जगताप यांची नावे चर्चेत आहेत. नेमके उद्याच कळेल.