धक्कादायक! जामखेड तालुक्यात दोन लेकरांसह आईने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
दोन लेकरांसह २५ वर्षीय आईने घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील रूपाली नाना उगले (वय २५), समर्थ नाना उगले (वय ५), चिऊ नाना उगले (वय ३) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
घरात पती नाना उगले, पत्नी रूपाली उगले, मुलगा समर्थ उगले, मुलगी चिऊ उगले असे चार जण राहत होते. सायंकाळी मुले शाळेतून आल्यावर शाळेच्या गणवेशामध्ये दोन्ही मुलांना विहिरीवर घेऊन जात बगलेत घेऊन विहिरीत उडी घेतली व जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती कळताच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उज्वल रजपूत आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक जमा झाले होते. बराच वेळ गोंधळ चालू होता. वरील घटनेचा तपास खर्डा पोलीस करत आहेत.
ही धक्कादायक बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.