जामखेडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात समविचारी पक्षांनी फुंकले रणशिंग गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसाठी समविचारी पक्ष सज्ज

0
449

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात समविचारी पक्षांनी फुंकले रणशिंग

गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसाठी समविचारी पक्ष सज्ज

 

जामखेड तालुक्यात सत्ताधारी पक्ष गर्विष्ठ झाला आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न तसेच आहेत जनतेला अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्यासाठी जामखेड मधील अनेक समविचारी पक्षांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा समर्थ पर्याय देण्याचा विचार केला आहे.

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध समविचारी राजकीय पक्ष व संघटनांची एकत्रित बैठक आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ओम साई हॉटेल, जामखेड येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्रितपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार करण्यात आला.

शेतकरी, कष्टकरी, महिला, भटके-विमुक्त, दलित, अल्पसंख्यांक, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा व कर्जमाफी अशा मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत या निवडणुकीत जनता केंद्रस्थानी ठेवून लढा उभारण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

बैठकीत वक्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “छोट्या पक्षांतील फाटाफूट आणि स्पर्धेमुळे सत्ताधाऱ्यांना संधी मिळते. आता याला थांबवून एकत्रित संघर्षाची गरज आहे.

या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.डॉ.अरुण जाधव,काँग्रेसचे शहाजी राजेभोसले व युवक काँग्रेसचे राहुल उगले,मनसेचे प्रदीप टाफरे व हवा सरनोबत,आतिश पारवे,प्रहार जनशक्तीचे नय्युम शेख,जयसिंग उगले,रासपाचे विकास मासाळ व डॉ. प्रकाश कारंडे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सुनील लोंढे,आम आदमी पक्षाचे संतोष नवलाखा,अजय भोसले,बजरंग सरडे,सुंदर परदेशी,बदाम गायकवाड,गणेश जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून, आगामी निवडणुकीत एकत्रित लढा देण्यासाठी लवकरच कृती आराखडा जाहीर करण्यात येईल, असे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here