जामखेडमध्ये नगरपरिषद प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन
जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील नागरिक अनेक मूलभूत प्रश्नांनी हैरान झाले असून, त्याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) आणि मित्र पक्षांच्या वतीने नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शहरात वारंवार होणारी पाणीकपात, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, मोकाट जनावरांचा सुळसुळाट, शहरात सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य, गल्लीगल्लीत पसरलेली अस्वच्छता आणि ठिकठिकाणी पडलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांनी नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे.
या सर्व तक्रारींविषयी वेळोवेळी नगरपरिषदेकडे निवेदने देण्यात आले, अर्ज आणि विनंत्या करण्यात आल्या, परंतु प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.
विशेषतः नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागरिकांना भेट देण्यासही सतत टाळाटाळ करत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. प्रशासनाची ही वागणूक जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा बगल देणारी असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने गेल्या काही दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासन, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतरही नगरपरिषदेला जाग आली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनाला राजेंद्र कोठारी (राष्ट्रवादी प्रदेश सरचटणीस ), वैजिनाथ पोले(जेष्ठ पदाधिकारी), विजयसिंह गोलेकर (तालुकाध्यक्ष), सय्यद वसिम इसाक (युवक शहर अध्यक्ष), प्रशांत जालिंदर राळेभात (तालुका युवक अध्यक्ष), रामहारी शिवाजी गोपाळघरे (तालुका युवक कार्याध्यक्ष ), मंगेश आजबे (पदाधिकारी), निखिल मुकुंद घायतडक (नगराध्यक्ष), अमोल रमेश गिरमे (मा. शहर युवक अध्यक्ष), राजेंद्र आजींनाथ गोरे (मा. शहर अध्यक्ष), मगर बाबासाहेब रामदास, फिरोज बागवान, कुंडल राळेभात, विकी घायतडक, प्रकाश सदाफुले, विक्रांत अब्दुले (काँग्रेस युवक शहराध्यक्ष) चाँद तांबोळी, उमर कुरेशी, हरिभाऊ आजबे, गणेश अशोक घायतडक, सिद्धेश्वर लटके, पोकळे अक्षय प्रमोद, दादासाहेब महाडिक, शेख बिलाल, समीर चंदन, रामहारी बाबर, बिभिशन शामराव धनवडे (मा.नगरसेवक), महेश रामचंद्र राळेभात, संजय डोके, सचिन शिंदे, रावसाहेब श्रीरामे, मनोज कार्ले, आसिफ शेख, प्रवीण उगले, अँड ऋषिकेश डूचे, पांडुरंग माने, संदीप गायकवाड, सुरेश पवार, सोहेल बागवान, निलेश रंधवे, तुषार खैरे, सागर हरीचंद्र जगताप, प्रतीक ज्ञानदेव राळेभात, शेख नय्युम सुबेदार, आण्णासाहेब ढवळे, शंकर कैलास खैरे, आण्णा चंद्रकांत मोरे, बापू लोखंडे, नाना लोखंडे, राजेश चेमटे, अशोक घुमरे, मनोज राळेभात, शेख सादिक उपस्थित होते.
चौकट ठिय्या आंदोलनामुळे झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जाग आली असून नगरपरिषदेच्या विभागप्रमुखांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच पुढील आठ दिवसात टप्प्याटप्प्याने हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तूर्तास हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले असून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता, मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि रस्त्यांची कामे हे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.