जामखेडच्या नाचगाण्यांच्या पंचमीला आनंदी मेळ्यामुळे वेगळे स्वरूप – अर्चनाताई राळेभात संपत राळेभात व अर्चनाताई राळेभात यांनी महिला बचत गटांसाठी मोफत जागा दिल्याने अनेक महिलांना मिळाला आर्थिक आधार
जामखेडच्या नाचगाण्यांच्या पंचमीला आनंदी मेळ्यामुळे वेगळे स्वरूप – अर्चनाताई राळेभात
संपत राळेभात व अर्चनाताई राळेभात यांनी महिलाबचत गटांसाठी मोफत जागा दिल्याने अनेक महिलांना मिळाला आर्थिक आधार
जामखेडची नागपंचमी राज्यात नाचगाण्यांसाठी प्रसिद्ध होती. माता भगिनी लहान मुलांना पाहण्यायोग्य नव्हती. नागपंचमी निमित्ताने आनंद नगरी मेळा भरतो. याठिकाणी लहान मुले, माता भगिनी, नातेवाईक यांना सर्वाना पाहता येतो आनंद घेता येतो तसेच वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करता येते.
यामुळे नाचगाण्यांसाठी प्रसिद्ध असणारी नागपंचमी आनंदी मेळ्यासाठी नावारूपाला येत आहे. तसेच बचत गटातील महिलांना मोफत जागा दिल्याने महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या अर्चनाताई राळेभात यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की. जामखेड ची नागपंचमी म्हणजे दिवाळी पेक्षा मोठा सन आणी आता आनंदीमेळा यामुळे नावारूपाला येत आहे तसेच या आनंदी मेळ्यात महिला बचत गटाच्या स्टाँल साठी विनामूल्य जागा दिल्याने अनेक बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच महिला उद्योजक म्हणून त्या पुढे येत आहेत. संपत राळेभात व अर्चनाताई राळेभात यांच्या संकल्पनेतून बचत गटातील महिलांना स्टाँल साठी मोफत जागा देण्यात आली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड परिसरातील नागेश्वर मंदिर परिसरातील रस्ते, विंचरणा नदी परिसरातील रस्ते, महादेव मुर्ती, नाना नाणी पार्क अशी ठिकाणे फिरण्यासाठी चांगले झाले आहेत. महिला, मुली, वृध्द माणसे यांना इथे फिरता येते.
आगोदर कोठेही जाता येत नव्हते. तसेच लिलाव जास्त झाल्याने तिकीट जास्त आकारले जाते तेव्हा बाहेरच्या लोकांना लिलाव बोलण्याची संधी दिली जाऊ नये. कमी लिलाव झाला की, तिकीट दरही कमी ठेवता येईल. लोकांच्या खिशाला झळ कमी लागेल.
यावेळी बोलताना बचत गटातील महिला वैष्णवी कडू म्हणाल्या की, आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांच्या मुळे जामखेड परिसरात बचत गट उभे राहिले आणि संपतनाना राळेभात व अर्चनाताई राळेभात यांच्या मुळे बचत गटाला स्टँड प्लॅटफॉर्म मिळाला.
आदर्श महिला बचत गटांच्या प्रमुख भाभी म्हणाल्या की, संपत राळेभात व अर्चनाताई राळेभात यांच्या मुळे जामखेड आनंदी बाजार मध्ये आम्हाला फुकट जागा मिळाली. यामुळे मी माझ्या मुलाची शाळेची फी भरली.
अनुराधा आडाले सईबाई महिला बचत गट प्रमुख म्हणाल्या की, आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड परिसरात महिला बचत गट उभे राहिले व संपतनाना राळेभात व अर्चनाताई राळेभात यांच्या मुळे इतिहासात प्रथमच बचत गटाला मोफत जागा मिळाली. यामुळे अनेकांना रोजगार तसेच महिला उद्योजक उभ्या राहत आहेत.