नाचगाण्यांची असणारी जामखेडची पंचमी झाली आता कुस्त्यांची कै.विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान यशस्वीरित्या संपन्न
नाचगाण्यांची असणारी जामखेडची पंचमी झाली आता कुस्त्यांची
कै.विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थभव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान यशस्वीरित्या संपन्न
नागेश्वराच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे कै. विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ जामखेड येथे आयोजित केलेले भव्य दिव्य विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान यशस्वीरित्या संपन्न.या भव्य जंगी कुस्ती मैदानासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे साहेब हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी) , श्री श्री 1008 महामंडलेश्वर नितीन दासजी महाराज, मा.श्री.दिलीप (दादा) जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ) ,मा. श्री मधुकर (आबा) राळेभात श्री दत्तात्रय वारे,श्री रवींद्र सुरवसे श्री शरद कारले, श्री गौतम (अण्णा) उत्तेकर श्री बापूराव ढवळे,संजय काशिद , सचिन घुमरे, श्री गणेश जगताप,विष्णू भोंडवे, महारुद्र महारणवर,विनोद उगले,सुभाष काळदाते,केशव वणवे, कांतिलाल वराट, काकासाहेब चव्हाण, आप्पा मुरूमकर ,तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन मा.पै.बबन (काका) काशिद (उपमहाराष्ट्र केसरी तथा अध्यक्ष मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन महाराष्ट्र) & मा. श्री. युवराज (भाऊ) काशिद (अध्यक्ष,मराठी भाषिय संघ मध्य प्रदेश) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
दुपारी 1 वा. शनी मंदिर या ठिकाणी विधीवत नारळ वाढवून फेरीनंतर मैदान सुरू झाले ते रात्री 9 पर्यंत सुरू होते. कुस्तीवर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत मैदानामध्ये बसून होता शेवटची कुस्ती संपेपर्यंत प्रेक्षकांनी मैदान सोडलेच नाही.
नाच गाण्यांची असणारी जामखेडची पंचमी आता कुस्त्यांची झाली आहे. जामखेडची पंचमी ही पूर्वी काळी नाच गाण्या साठी प्रसिद्ध असायची, अलीकडच्या काळातील या कुस्ती मैदानामुळे तिची जुनी ओळख पुसून कुस्त्यांची जामखेडची पंचमी अशी ओळख होत आहे. ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे. परिसरातील सर्व लहान मोठ्या पैलवानांना या मैदानामुळे चांगले व्यासपीठ / मैदान मिळते. तयारी करण्यास वाव मिळतो, अनुभव मिळतो. व हाच अनुभव जिल्हा,राज्य व देश स्तरावरील कुस्ती स्पर्धांसाठी कामी येतो. असे एका नामांकित पैलवानाने बोलताना सांगितले.
या कुस्ती मैदानामध्ये शेवटची मानाची कुस्ती पै.सतपाल सोनटक्के (शिवनेरी अकलूज) विरुद्ध पै. कालीचरण सोलनकर (गंगावेस कोल्हापूर) यांच्यामध्ये मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्ती झाली. या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पै.कालीचरण सोनवलकर यांनी मानाची गदा पटकावली!!
यानंतर नावाजलेले पै.भैया धुमाळ (अकलूज) विरुद्ध पै.फैयाज हुसेन (इंदोर) यांच्यामध्ये अटीतटीच्या कुस्तीत पै.भैय्या धुमाळ विजयी झाला. व चुरशीच्या कुस्त्या झाल्या. यासोबतच परिसरातील नावाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी कुस्ती शौकिनांना पाहायला मिळाल्या.
चौकट… दरवर्षी मी या कुस्ती मैदानाला हजर असतो.एडवोकेट श्री.अजय काशीद & काशीद कुटुंबाच्या वतीने या कुस्ती मैदानाचे यशस्वीरित्या आयोजन केले जाते. ही जामखेडकरांसाठी आनंदाची बाब आहे.या कुस्ती मैदानामध्ये यापूर्वी ही नावाजलेल्या मल्लांच्या कुस्त्या झालेले आहेत.श्री.अजय काशीद हे ग्रामीण भागातील मल्लांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे चांगले काम दरवर्षी करतात. त्यांच्या या कार्यास व सर्व पैलवानांना पुढील यशासाठी शुभेच्छा… प्रा.श्री.राम शिंदे ,सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य.
“चौकट -“ _श्री.अजय (दादा ) काशीद भाजपा पक्ष संघटनेमध्ये महत्त्वाची पदे यशस्वीपणे सांभाळत,आपल्या नेतृत्वाची चुणूक पक्षश्रेष्ठींना दाखवली आहे. समाजकार्याची विविध कामे ते आवडीने करत असतात. आदर्श गाव सारोळ्याचे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध सरपंच म्हणून ते चांगले काम पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सारोळा शाळेने मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेमध्ये मागील सलग दोन वर्ष अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व द्वितीय क्रमांक मिळवत पाच लाखाचे बक्षीस मिळवले आहे. आषाढी एकादशीनिमित्त अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडी इंदोर या दोन्ही दिंड्यांचे यजमान म्हणून पाहुणचाराचे काम दरवर्षी मनोभावे करून धर्म जोपासना पण करण्यात ते आघाडीवर असतात. गेल्या 23 वर्षापासून वडील स्व. विष्णू उस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती मैदानाचे यशस्वी यशस्वीपणे आयोजन करण्यात ते आणि त्यांचा मित्रपरिवार आघाडीवर असतो._
या कुस्ती मैदानाचे आयोजन मा.श्री.अजय (दादा) काशीद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.या कुस्ती मैदानाचे सुंदर समालोचन धावते वर्णन प्रा.श्री हंगेश्वर धायगुडे यांनी केले.