जामखेड न्युज—–
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेत आ.रोहित (दादा) पवार यांचा सत्कार संपन्न
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते जगन्नाथ तात्या राळेभात पाटील सभागृहात कर्जत जामखेडचे लोकप्रिय आ.मा.श्री.रोहित (दादा) पवार साहेब यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी व सर्व फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदी तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात व मार्केट कमिटीचे मा.सभापती व विद्यमान संचालक सुधीर दादा राळेभात यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अमोल दादा राळेभात म्हणाले की,रोहित दादा ज्याप्रमाणे कर्जत जामखेड मतदार संघाचा विकास करत आहे तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे काम करत आहेत याशिवाय विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता पद नसतानाही सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत ठामपणे व निर्भिडपणे मांडत आहेत.विरोधी पक्षनेत्याची भूमिका मांडताना महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांची मांडणी करून सामान्य शेतकरी, कष्टकरी,सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणेसाठी अथक प्रयत्न करत आहेत.
त्याचप्रमाणे पक्षाच्या सरचिटणीस पदाची, फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदाची तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रोहित दादा अत्यंत यशस्वीपणे सांभाळतील व त्याचा नावलौकिक होईल.
यावेळी रोहित दादा पवार यांनी बोलताना राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहे की, सर्वसामान्यांना या राज्यकर्त्यांचा तिरस्कार वाटायला लागला आहे. या सरकारमधील मंत्री महोदय अधिवेशनामध्ये रम्मी खेळण्यात व्यस्त असून या राज्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडल्याची खंत व्यक्त केली.
त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच पुढील ४ वर्षात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास दिला. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये व मार्केट कमिटीमध्ये अमोल दादा व सुधीर दादा हे दोन्ही बंधू अत्यंत चांगले काम करत असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे संचालक श्री.कैलास वराट सर, विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, सतीश शिंदे, सुरेश पवार त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र कोठारी,विजयसिंह गोलेकर, सुरेश भोसले तसेच सहकारी संस्थेचे अंकुश कोल्हे, डॉ.अविनाश पवार, किसन ढवळे, महादेव डिसले, महादेव डुचे सर, लक्ष्मण कोल्हे, दादाहारी थोरात, बाबासाहेब इथापे, शहाजी मिसाळ, विलास जगदाळे, मिठू खोसे, बलभीम परकड, राजेंद्र गोलेकर, राजेंद्र मोटे, शहाजी पवार, बबन ढवळे, अशोक पाटील याशिवाय जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.) पक्षाचे रमेश आजबे, दत्ता पा.सोले, निखील घायतडक, कल्लू चाचा, हरिभाऊ आजबे, वैजिनाथ पोले, गणेश डोके, मगर साहेब, हरिभाऊ बेलेकर, बिभीषण धनवडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व इतर अनेक मान्यवर खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.