आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा – डीवायएसपी संतोष खाडे
ल. ना. होशिंग विद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबीर
आपले ध्येय निश्चित करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा मी स्वतः आई-वडिलांचा कोयता बंद करण्याचे ध्येय निश्चित केले होते. आणी ते पुर्ण करत आज अधिकारी म्हणून उभा आहे. आपली स्वतःची बौद्धिक, आर्थिक,शारीरिक क्षमता ओळखून आपण त्याप्रमाणे शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे.
मोबाईल पासून स्वतः दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जरी मोबाईल आपण घेतला तर त्यातील काही चांगल्या वेबसाईट पाहून अभ्यासच केला पाहिजे ग्रंथालयाचा वापर वाढून मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे इयत्ता दहावी व बारावी हा आपल्या शालेय जीवनातील सुरुवातीचा पाया आहे सुरुवातीपासूनच आपण कष्ट घेतले पाहिजेत.
ल ना होशिंग विद्यालयामध्ये माननीय संतोष खाडे साहेब परीविक्षाधिन जिल्हा पोलीस उपअधीक्षक अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी,राजेश मोरे माजी खजिनदार दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड,
ॲड.प्रवीणजी सानप, काकासाहेब गर्जे.जहीर शेख, गणेश काळे, मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे , उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया घायतडक, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे व भरत लहाने,बबन राठोड,पोपट जगदाळे, कैलास वराट,विशाल पोले, उमाकांत कुलकर्णी, रोहित घोडेस्वार, किशोर कुलकर्णी,आदित्य देशमुख, साई भोसले, स्वप्निल जाधव आदीमान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला आदरणीय संतोष खाडे साहेबांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी कलाशिक्षक मुकुंद राऊत यांनी वाढदिवसानिमित्त साहेबांना चित्र सप्रेम भेट दिले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संतोष खाडे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिस्तीबद्दल कौतुक केले.
आज जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व तुमचे शिक्षक तुम्हाला माहिती देत असतील. आज माझा वाढदिवस ल ना होशिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व गुरुजनांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यासाठी मी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे खाडे यांनी सांगितले.
अमितजी चिंतामणी विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनीही मा.संतोष खाडे साहेब यांच्या कार्याची ओळख करून देत त्यांनी घेतलेले कष्ट आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला अभ्यास यामुळेच ते आज डीवायएसपी पदापर्यंत पोहोचलेले आहेत.
त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांचे आयडॉल ग्रामीण भागातील तरुण आपल्या धडाडीच्या कार्यामुळे व कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे.असे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले.