जवळा येथील रथयात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी, सभापती प्रा. राम शिंदे व खासदार निलेश लंके यांची हजेरी.

0
580

जामखेड न्युज—–

जवळा येथील रथयात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी, सभापती प्रा. राम शिंदे व खासदार निलेश लंके यांची हजेरी.

गुरूपोर्णिमेनिमित्त तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो भाविकांनी रथयात्रेला हजेरी लावली.

श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द असून, गुरूपोर्णिमेनिमित्त साज-या होणा-या रथयात्रेला वेगळे महत्व आहे. रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून, रथामध्ये प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.

यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतानाच नारळाचे तोरण रथाला अर्पण केले. दुपारी एक वाजता रथाची महाआरती करून, मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. रथ मिरवणूक विठ्ठल मंदिर, बसस्थानक,मराठी शाळा,बाजारतळ मार्गे सायंकाळी सातच्या दरम्यान वेशीच्या आत आली. यावेळी मारूती मंदिरावर दहीहंडी फोडून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.

 

रात्री बारा वाजणेच्या सुमारास रथयात्रा जवळेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर हरहर महादेवाचा जयघोष होवून,यात्रेची सांगता झाली.

यात्रेनिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे , खासदार निलेश लंके यांनी जवळा येथे येवुन जवळेश्वराचे दर्शन घेतले. जेष्ठनेते प्रा मधुकर राळेभात , बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सुधीर राळेभात , माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रभाकर निकम, पोलीस उपनिरिक्षक नंदकुमार सोनवळकर यांनी यात्रेदरम्यान पाच दिवस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here