नियमबाह्य वाहनांबाबत जामखेड पोलीस अँक्शन मोडवर, एकाच दिवशी वीस वाहनांवर कारवाई करत हजारो रूपयांचा दंड वसूल गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची आदर्श नियमावली
नियमबाह्य वाहनांबाबत जामखेड पोलीस अँक्शन मोडवर, एकाच दिवशी वीस वाहनांवर कारवाई करत हजारो रूपयांचा दंड वसूल
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची आदर्श नियमावली
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलीसांनी परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई ला सुरूवात केली आहे तसेच अवैध धंदे, नियमबाह्य वाहतूक, रोड रोमिओ यांच्या विरोधात कडक अँक्शन घेत कारवाईला सुरूवात केली. हॉटेल, कलाकेंद्र, पानटपऱ्या कती वाजेपर्यंत उघड्या राहतील यासाठी तसेच वाहनचालकांसाठी एक आदर्श नियमावली लागू केली. यानुसार शहरातील खर्डा चौकात वीस नियमबाह्य वाहनांवर कारवाई करत 19500 रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार अमोल आजबे, पोलीस अंमलदार प्रणव चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश दळवी, होमगार्ड रफीक तांबोळी, पवार यांच्या पोलीस पथकाच्या नेतृत्वाखाली आज खर्डा चौकामध्ये नाका बंदी करुन विना परवाना गाडी चालवणे व वाहनाच्या गाडीच्या काळ्या रंगाच्या काचा आसणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करण्यात आली असून या धडक कारवाई मुळे जामखेड तालुक्यातील व शहरामध्ये पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या धडक कारवाई मुळे सर्व सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दिनांक-08/07/2025 रोजी त वा. खर्डा चौक जामखेड येथे नाकाबंदी दरम्यान खालील प्रमाणे केसेस करण्यात आले आहेत. 1-04 नो पार्किंग 2-05 ब्लॅक फ्रेम 3-09 ट्रिपल सीट 4-02 एका बाजूला नंबर प्लेट नसणे 5-01 गाडी चालवताना मोबाईलवर बोलने. 6-01 मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक प्रवास करणे. अशा एकूण 20 केसेस व 19500 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
रात्री अकरा वाजता हाॅटेल पानटपरी बंद जामखेड शहरातील अनेक हाॅटेल व पानटपऱ्या रात्री बराच वेळ चालू असावयाच्या यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावले होते. यावर नियंत्रणासाठी हाॅटेल चालकांना सक्त नियमावली लागू केली आहे. रात्री अकरा ला बंद म्हणजे बंद यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारी ला आळा बसणार आहे.
कलाकेंद्र रात्री एक वाजता बंद जामखेड परिसरात नऊ कलाकेंद्र आहेत. रात्री कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणावर हौसे, नवसे, गवसे येतात आणि रात्री एक नंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय तसेच वेगळाच नंगानाच सुरू असायचा यावर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आळा घातला आहे. रात्री एक वाजता बंद म्हणजे बंद हा नियम आणलेला आहे. अनेक पर जिल्ह्यातील गुन्हेगार कलाकेंद्रा च्या आश्रयास येत होते. यावर चाप लावला आहे.
वाहतुकीसाठी शिस्त
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळ्या काचा तसेच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट (मोटार सायकल) तसेच कर्णकर्कश आवाज करणारे तसेच विना लायसन्स वाहने चालवणे आता महागात पडणार आहे कारण या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कर्णकर्कश आवाज असणाऱ्या तसेच काळ्या काचा गाड्या वर जामखेड पोलीसांनी धडक मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. यामुळे नियमबाह्य वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
चौकट
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे जामखेड पोलीस स्टेशनला हजर झाल्या पासून जामखेड तालुक्यातील व शहरामध्ये जुगार, मटका, मावा, गुटखा,शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालण न करणाऱ्या कलाकेंद्रावर , आणि अवैध रीत्या चालणारे धंदे बंद करण्यात आले आहेत तसेच गुन्हेगारांचा गर्दन काळ ठरलेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अनेक गुन्हेगाराच्या मुसक्या आळून अट्टल गुन्हेगारांचा बिमोड करणार असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले आहे.