खुनाच्या व इतर अनेक गुन्ह्यातील आरोपीची जामखेड पोलीसांनी केली नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी

0
2460

जामखेड न्युज—–

खुनाच्या व इतर अनेक गुन्ह्यातील आरोपीची जामखेड पोलीसांनी केली नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी

 

प्राणघातक हत्याराने नागरिकांना मारहाण करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुन करणे तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या विविध गुन्ह्यातील आरोपी सागर मोहळकर यास जामखेड पोलीसांनी पकडून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. जामखेड पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

फिर्यादी सलमान सुलेमान शेख, वय २९ वर्षे, रा.सदाफुलेवस्ती जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी जामखेड पो.स्टे. ला तक्रार दिली की, दि.३०/५/२०२५ रोजी पहाटे ०५.३५ वा. चे सुमारास ते नेहमी प्रमाणे सेव्हन फिटनेस क्लब (जिम) पंचायत समिती समोर जामखेड येथे जिम करत असताना तेथे आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर, रा. जामखेड, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर हा त्यांचे जवळ गेला व म्हणाला की, तु जिम मध्ये उशीरा का आला असे म्हणून फिर्यादी सुलेमान शेख यांना शिवीगाळ करून गालावर चापट मारली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना कंबरेला धरून वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर जोरात आपटुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

सदरचा आरोपी सागर दत्तात्रय मोहोळकर हा जामखेड, ता. जामखेड येथील राहणारा असून तो कोणत्याही प्रकारचा काहीएक कामधंदा करत नाही. तो अत्यंत नंगट, धाडसी व खुनशी वृत्तीचा आहे. तो तसेच त्याचे साथीदारांचे मदतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करुन वेगवेगळया प्रकारचे गुन्हे करत असतो त्याने यापूर्वी जेलमध्ये अटक असताना एका आरोपीचा खुन केला आहे. त्याचेवर खालील प्रमाणे यापुर्वी सुध्दा गुन्हे दाखल आहेत.

आरोपी सागर मोहळकर वर असलेले विविध गुन्हे

 

जामखेड पोलीस ठाणे, जि.अहिल्यानगर
२६४/२०१९ भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९,३३६,५०४ प्रमाणे

जामखेड पोलीस ठाणे, जि.अहिल्यानगर
४५८ / २०२१ भादंवि क. ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे

जामखेड पोलीस ठाणे, जि.अहिल्यानगर

३६/२०२२ भादंवि क. ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे

पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे

२०८/२०२२ भादंवि क. ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सागर मोहळकर याने यापूर्वी प्राणघातक हत्याराने नागरिकांना मारहाण करत जेलमध्ये खुनही केलेला आहे तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारचे गंभीर स्वरुपाचे विविध कलमान्वये गुन्हे केलेले असून सध्या तो फरार राहुन त्याचे अस्तित्व लपवत होता. त्याच्या अशा गुन्हे करण्याचे वृत्तीमुळे जामखेड तालुक्यात व परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती त्याचे पासून जनतेच्या शारिरिक भय व धोका निर्माण झालेला होता. 

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, प्रभारी अधिकारी जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा आरोपी सागर मोहळकर हा सेव्हन फिटनेस जिम जामखेड येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी जामखेड पो.स्टे. थे स.पो.नि. नंदकुमार सोनवलकर, पो. स. ई. किशोर गावडे, पोहेकॉ इंगळे, पो.ना. बाघ, पो.ना. सरोदे, पोकों/ घोळवे, पोकों/ पळसे, पोकों/माने, पोकों/दळवी, पोकों/ बोराटे, पोकों/बेलेकर, पोकों/कोठुळे, अशांचे पथक तयार केले व त्यांना योग्य त्या सुचना दिल्या आणि पोलीस पथकाने आरोपी सागर मोहळकर यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.

तो नांगट व खुनशी प्रवृतीचा असल्याने त्याला जामखेड कारागृहात न ठेवता मा. न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तानिशी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी केली आहे.सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here