सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली 64 रणरागिणींनी राबविली प्रतापगडावर स्वच्छता मोहीम

0
265

जामखेड न्युज—–

सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली 64 रणरागिणींनी राबविली प्रतापगडावर स्वच्छता मोहीम

जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकारातून गड किल्ले स्वच्छता मोहिम

 

जामखेड भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित मुलींना मोफत गड कोट किल्ले मोहिमे अंतर्गत प्रतापगड किल्ले मोहिम तसेच किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली जामखेड परिसरातील 64 रणरागिणींनी गडावर स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवजन्मोत्सव समितीच्या प्रमुख सौ. रोहिणीताई संजय काशिद, सौ. मीनाताई बेलेकर, सौ. सुनीताताई बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड परिसरातील सुमारे 64 मुली या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला) रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.

शनिवार दि. १४ रोजी सायंकाळी 9.00 वा. जामखेड येथील लक्ष्मी चौक (रूद्रा पेंटस् समोर) सुमारे 64 मुलींनी प्रतापगडाकडे प्रस्तान केले होते. रविवार दि. १५ रोजी प्रतापगड किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या उपक्रमाचे जामखेड परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई संजय काशिद यांनी महिला व मुलींसाठी मोफत गड कोट किल्ले मोहिमेंतर्गत प्रतापगड किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली लहान वयातच स्वच्छता व स्वराज्याविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी हा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. 

दरवर्षी रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली गड कोट किल्ले मोहिमेंतर्गत एका किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यानुसार रायगड, शिवनेरी, सिंहगड आणि या वर्षी प्रतापगड किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here