डॉ. सहर्ष घोलप यांची वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य कार्यकारणीवर निवड
आरोग्य क्षेत्रातून केलेल्या जनसेवेच फळ डॉ.सहर्ष घोलप यांना मिळालं!
अनेक वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये डॉ.सहर्ष घोलप हे काम करत आहेत. अनेक गोरगरीब गरजूवंतांना त्यांच्या माध्यमातून योग्य तो उपचार व मार्गदर्शन मिळून शासनाच्या निधी मिळणे पर्यंत सहकार्य केले आहे.
या सर्वांची दखल घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आज महाराष्ट्रामध्ये गोरगरीब, दिन दुबळ्यांच्या मदतीला धावणारा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचं असलेलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे.
इथे गोरगरीब, गरजवंत, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचा उपचार करून मिळतो. त्यांच्या हक्काचा त्यांना मिळाले पाहिजे या हेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या माध्यमातून अनेक गोरगरीब, गरजूवंत, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हे वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आले होते.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून अनेक गरजूवंतांना त्यांच्या हक्काचा मोबदला योग्य ते उपचार योग्य ती मदत वेळोवेळी मिळवून देण्यात आली आहे. जामखेड येथील डॉ.सहर्ष घोलप यांची शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आली आहे. निवड पत्र संस्थापक अध्यक्ष मंगेश नर्सिंग चिवटे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे.
★आरोग्य क्षेत्रातून गरजूंना मदत करण्याची सुवर्णसंधी : डॉ.सहर्ष घोलप
मी अनेक वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनेक गरजवंतांना शासनाच्या योजना व त्यांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले आहे. आता शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी असल्याने अधिक आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. शिवसेना वैद्यकीय पक्षाच्या माध्यमातून प्रधानमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांच्यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथे संपर्क साधून गरजूवंतांना मदत मिळून देता येईल हे माझं भाग्य समजतो.. – डॉ.सहर्ष घोलप (राज्य कार्यकारिणी सदस्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.)