जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागाच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर जामखेड मध्ये तीन जिल्हा परिषद गट तर सहा गण राहणार, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी ला सुरूवात
जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागाच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर
जामखेड मध्ये तीन जिल्हा परिषद गट तर सहा गण राहणार, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी ला सुरूवात
राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समिती च्या सार्वजनिक निवडणुकीकरीता प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यानुसार अहिल्यानगर मध्ये 75 जिल्हा परिषद गट राहणार आहेत. यानुसार जामखेड मध्ये तीन जिल्हा परिषद गट तर सहा गण राहणार आहेत. यामुळे आता इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील गट आणि गण रचना जाहीर करण्यात आला आहे. सदर गट आणि गण रचना २०११ च्या लोकसंखेच्या अनुषंगाने गृहीत धरून तयार करण्यात आली आहे. मागील २०१७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकमध्ये जामखेड तालुक्यात २ गट आणि ४ गण तयार करण्यात आले होते. २०१७ साली अ नगर जिल्ह्याचे एकूण ७५ गट होते २०२२ च्या निवडणुकीसाठी गट संख्येमध्ये १० ने वाढ होऊन ८५ गट तयार करण्यात आले होते. पण आता अहिल्यानगर जिल्हा परिषद साठी ७५ गट राहणार आहेत यामुळे जामखेड जिल्हा परिषद साठी तीन गट तर सहा गण राहणार आहेत.
राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समिती च्या सार्वजनिक निवडणुकीकरीता प्रभाग रचना कार्यक्रम
त्यानुषंगाने जामखेड तालुक्यामध्ये ३ गट आणि ६ गण तयार करण्यात आले आहेत. २०११ च्या लोकसंख्ये प्रमाणे एकूण लोकसंख्या ११८८२९ असून अनुसूचित जातीची लोकसंख्या १६०६६ आहे तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३०९२ इतकी आहे.यानुसार जामखेड मधील ३ गट आणि ६ गट खालीप्रमाणे आहेत.
संभाव्य गट व गणातील गावे गटाचे नाव ८३ साकत गणाचे नाव १६५ साकत
या गणामध्ये साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, मोहा, सावरगाव, देवदैठण,नाहुली, धामणगाव, जायभायवाडी, दिघोळ, अशा एकूण ८ ग्रामपंचायत आणि ११ गावांचा समावेश असेल
गणाचे नाव १६६ शिऊर या गणामध्ये शिऊर, नायगाव, तेलंगशी, मोहरी, राजुरी,डोळेवाडी, आनंदवाडी, सारोळा, काटेवाडी, पाडळी, जातेगाव, खुरदैठण, बांधखडक अशा एकूण ११ ग्रामपंचायत आणि १३ गावांचा समावेश असेल
गटाचे नाव ८४ जवळा गणाचे नाव १६७ जवळा
या गणात कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी,हाळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी, जवळा, राजेवाडी, धोंडपारगाव, अशाएकूण १० ग्रामपंचायत आणि १२ गावांचा समावेश असेल
गणाचे नाव १६८ अरणगाव
या गणात अरणगाव, पारेवाडी, डोणगाव,फक्राबाद, पाटोदा, खामगाव,भवरवाडी,रत्नापूर,सांगवी, कुसडगाव, सरदवाडी, खांडवी,डिसलेवाडी, धानोरा, वंजारवाडी, झिक्री अशा एकूण ९ ग्रामपंचायतआणि १६ गावांचा समावेश असेल
गटाचे नाव ८५ खर्डा गणाचे नाव १६९ खर्डा
या गणात खर्डा, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी,आपटी, वाकी, बाळ गव्हाण, सातेफळ, पिंपळगाव आळवा, घोडेगाव, अशाएकूण ८ ग्रामपंचायत आणि १२ गावाचा समावेश असेल
गणाचे नाव १७० नान्नज
या गणामध्ये नान्नज, पोतेवाडी, वाघा, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौन्डाची वाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, चोभेवाडी,मुन्जेवाडी, बोर्ले, गुरेवाडी, महारुळी अशा एकूण १२ ग्रामपंचायत आणि१५ गावांचा समावेश असेल अशा प्रकारे गावे गट व गणात विभागले जातील. अशी शक्यता आहे.
प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे 14 जुलै 2025
जिल्हाधिकारी यांच्या कडे हरकती 21 जुलै 2025
प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त सादर करणे 28 जुलै 2025
प्राप्त हरकतीवरकार्यक्रम 11 आँगस्ट 2025
अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी निवडणुक आयोगाकडे सादरीकरण 18 आँगस्ट 2025
असा आदेश एकनाथ डबले प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेला आहे.