जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकारातून गड किल्ले स्वच्छता मोहिम
सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने प्रतापगड किल्ला मोहिम
जामखेड भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित मुलींना मोफत प्रतापगड किल्ले मोहिम तसेच किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला) रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.
शनिवार दि. १४ रोजी सायंकाळी 7.00 वा. जामखेड येथील लक्ष्मी चौक रूद्रा पेंटस् समोर येथून प्रतापगडाकडे प्रस्तान होणार आहे. रविवार दि. १५ रोजी प्रतापगड किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी महिला व मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोहिणी संजय काशिद यांनी केले आहे.
351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई संजय काशिद यांनी महिला व मुलींसाठी मोफत गड कोट किल्ले मोहिम आखली आहे.
प्रतापगड हा गड निवडला असून गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोहिणीताई संजय काशिद यांनी केले आहे.