रील बनविण्याच्या नादात बसली फाशी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता

0
2769

जामखेड न्युज—–

रील बनविण्याच्या नादात बसली फाशी

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत, फेसबुक इन्स्टाग्रामवर, “रील” नावाचे शॉर्ट व्हिडिओ फॉर्मेट वापरले जातात, जे लोक त्यांच्या आवडीचे व्हिडिओ शेअर करतात. यासाठी रील बनविण्याच्या नादात खुप धोकादायक ठिकाणी व्हिडिओ काढले जातात यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना जामखेड शहरात घडली आहे. फाशीची रील बनविण्याच्या नादात खरोखरच फाशी बसली घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता दाखवत दवाखान्यात दाखल केले सुदैवाने प्राण वाचले आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, जामखेड येथील नान्नज जवळा रोडवरील खटकळीच्या नाल्यात रोड सोडून एक हजार फूट रील बनवत असताना फाशीचे नाटक केले असता गळफास बसला या गोष्टीचा त्याच्या नातेवाईकांनी व्हिडिओ सुद्धा काढला आहे.

महत्त्वाचे म्हणजे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा प्रकाश भीम बुडा (वय १७) नेपाळ असे असून रील बनवताना आपल्या नातेवाईक असच व्हिडिओ काढायला लावला होता.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अनंता खेत्रे यांनी आज सकाळी आठ वाजता दिली फाशी घेतली म्हणजे माणूस गेला असे शंभर टक्के होत असते सदर घटना संजय कोठारी यांनी जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली परंतु पुन्हा पाच मिनिटांनी फोन आला.

त्यामध्ये थोडासा जीव असल्यासारखे वाटते सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले रोड सोडून साधारण पाचशे ते सातशे मीटर आत चिखलातून जाऊन संजय काका कोठारी व रोहन खेत्रे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास उचलून आणले.

रुग्णवाहिकेत आणून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्याची प्राण वाचले आहे
सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून महेश पाटील यांनी आपले पोलीस हवालदार इंगळे आणि सरोदे यांना पाठवून पुढील तपास चालू आहे

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले फाशी घेतलेल्या माणूस माझ्या ३५ वर्षाच्या काळात पहिल्याच वाचला आहे याबद्दल जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे खूप आभार मानले आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here