सामाजिक कामाच्या बळावर जवळा जिल्हा परिषद निवडणुक लढवणार – राजुशेठ देशपांडे
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करणार
जवळा जिल्हा परिषद गटात एक आपल्या हक्काचा माणूस, अडीअडचणीत मदत करणारा, सार्वजनिक कामात आपला सहभाग नोंदवणारा तसेच मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य, अनाथांना किराणा कपडे वाटप यात राजुशेठ देशपांडे नेहमीच अग्रेसर असतात याच बळावर जवळा जिल्हा परिषद निवडणुक लढविणार व सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिंकणार असा विश्वास जामखेड न्युजशी बोलताना देशपांडे यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात प्रत्यक्षात देवदूत म्हणून जवळा गटातील जनतेला मोठा आधार दिला. अनेकांना गोळ्या औषधे दिले तसेच अनेकांना हाँस्पीटल मध्ये दाखल करत बिलालाही हातभार लावला संपूर्ण गटात जनजागृती केली. तसेच किराणा किटचे वाटप केले.
मतदार संघातील मंदीरे, मठ यांच्या जीर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणात पदरमोड केली. तसेच मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक, फरसी, हायमॅक्स दिवे बसविले शिखर व मंदिराच्या कलरचे कामे पदरमोड करत मार्गी लावले. तसेच अनाथ मुलांना किराना ब्लॅकेट वाटप केले याचबरोबर गो शाळेला मोफत चारा वाटप करतात.
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत परिसरातील सामाजिक उपक्रमास लाखो रुपये देणग्या देत आपले दातृत्व दाखवून दिले आहे. तसेच परिसरातील अनेक गावात पाणीटंचाई च्या काळात मोफत पाणी वाटप करत लोकांची तहान भागवली आहे. तसेच अनेक गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नात संसारोपयोगी वस्तू वाटप केल्या जातात.
जवळा गटातील किंवा तालुक्यातील कोणीही अजारी पडले किंवा पुणे येथे ॲडमीट असले कि त्यांची भेट घेणार आर्थीक मदत करणार नातलगांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करतात. तसेच परिसरातील अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा यामध्ये आर्थिक मदत करतात. अनेक भजनी मंडळासाठी टाळ मृदुंग, पखवाज, लाऊडस्पीकर कीट दिलेले आहे. याचबरोबर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत वेगवेगळ्या उत्सवानिमित्त वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देतात.
राजुशेठ देशपांडे यांनी अडीअडचणीत मदत करणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून परिसरात ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कामे अधिक जोमाने करण्यासाठी राजकीय पद हवे याच दृष्टीने सामाजिक कामाच्या बळावर जवळा जिल्हा परिषद गटातून सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी अशी मागणी गटातील कार्यकर्ते करत आहेत. याच सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाच्या बळावर जवळा जिल्हा परिषद निवडणुक लढविणार व सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिंकणार असा विश्वास जामखेड न्युजशी बोलताना देशपांडे यांनी व्यक्त केला.