सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अरणगाव, कवडगाव परिसरात फळबागा व घरांचे नुकसान
दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अरणगाव, कवडगाव परिसरात फळबाग फळबागेचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या लिंबूनीच्या बागा उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.भाजपाचे ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी ताबडतोब तहसीलदार यांच्याशी बोलून नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी केली तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसाच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंबा, लिंबोळी बागांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. चिंतामणी राऊत, आजिनाथ सोनवणे, अंगद सोले, सविता आनारसे, मच्छिंद्र आंधळे, परसू शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, काकासाहेब निगुडे, आप्पासाहेब राऊत, सुनील थोरात, गणेश सोले, आजिनाथ सोले, सुनील राऊत, पंढरीनाथ राऊत, अवसरे महाराज, तुषार धनवट, पप्पू घनवट, ज्ञानेश्वर अवसरे, दादा भागवत, संजय निगुडे, सोमनाथ नन्नवरे, आजिनाथ नन्नवरे, बाळू निगुडे, अमोल चावरे, लाला सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, अंकुश कोथमिरे, दादा निगुडे, सचिन कारंडे, पोपट निगुडे, खंडू कोथमिरे, वसंत डोळे, सतीश शिंदे, भागवत कारंडे, महारुद्र जगताप, विजय शिंदे, अमोल थोरात, मारुती नन्नवरे, लक्ष्मण जाधव, अशोक शिंदे, संतू निगुडे, अशोक नन्नवरे, संतोष नन्नवरे, अर्जुन कोथमिरे, संतोष कोथमिरे, महादेव कारंडे, विजय गीते, नितीन शिंदे या शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहेत अशी माहिती माजी सरपंच लहू शिंदे यांनी दिली.
कवडगाव येथील हरिश्चंद्र मुरलीधर शेवाळे यांचे शेड पूर्णपणे पडले आहे. व त्यांच्या आईच्या छातीवर दगड पडल्याने जखमी झाल्या आहेत. खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.तर शत्रगुण संदिपान राऊत यांची लिंबोणीचीबाग पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे.
जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
या वर्षी मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला होता यावेळीही काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते.
सततच्या पावसामुळे खरीप पिकांची पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत.