जामखेड तालुक्याला अवकाळीचा तडाखा, मोहरीत वीज पडून बैलाचा मृत्यू, वीटभट्टींचे, शेतीचे मोठे नुकसान, जामखेड सौताडा महामार्गावर तळे

0
936

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्याला अवकाळीचा तडाखा, मोहरीत वीज पडून बैलाचा मृत्यू, वीटभट्टींचे, शेतीचे मोठे नुकसान, जामखेड सौताडा महामार्गावर तळे

 

गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी याठिकाणी शेतकरी राहुल भिसे यांच्या घराजवळ वीज कोसळून त्यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खर्डा येथील कौतुका नदीला पुर आलेला होता. जामखेड परिसरातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, वादळी वाऱ्यामुळे कांदा, आंबा फळांचे मोठे नुकसान झाले. शहरातील जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. शेतातील बांध फुटून अनेक ठिकाणी माती वाहून गेली. खर्डा, जवळा व नान्नज परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी देखील जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट सह खर्डा, तेलंगशी, मोहरी, धामणगाव, दिघोळ, जातेगाव, सातेफळ, नान्नज व जवळा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

जामखेड तालुक्यातील मोहरी याठिकाणी रविवार दि १८ रोजी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाट मुळे शेतकरी राहुल भिसे यांच्या घराजवळ वीज कोसळून त्यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच नायगाव या ठिकाणी देखील शेतकर्‍याने शेतात साठवून ठेवलेल्या कांदा भिजला आसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सध्या या कांद्याचा लाल चिखल झाला आहे.

जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी शेतकर्‍याच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा ठिकाणी महसूल विभागकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.

शहरातील वीटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कच्चा वीटा भिजून परत चिखल झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम अपुर्ण आहे.

       

अडिच वर्षापासून शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे कुठे मुरूम कुठे खडी तर कुठे खोदलेला रस्ता यामुळे शहरात बीड रोडवर रस्त्यावर तळे साचलेले होते नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here