जामखेड तालुक्यातील क्रिकेट खेळाडू शुभम घोडेस्वार ची आर्यन्स क्रिकेट अकादमी पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड

0
907

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील क्रिकेट खेळाडू शुभम घोडेस्वार ची आर्यन्स क्रिकेट अकादमी पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड

जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयातील खेळाडू शुभम घोडेस्वार हा सुशिल तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी मध्ये जामखेड महाविद्यालय जामखेड येथे सराव करत असुन त्यांने राष्ट्रीय तसेच आशियाई क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली याच बळावर त्याची आर्यन्स क्रिकेट अकादमी पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत क्रिकेट चे धडे गिरवत साकत येथील शुभम घोडेस्वार या खेळाडू ची आर्यन्स क्रिकेट अकादमी पुणे येथे पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. निश्चित तो खडतर प्रशिक्षण घेऊन आपले गावाचे व क्रिकेट अकॅडमी चे नाव उज्वल करणार आहे.

आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून निवड

मतदारसंघातील खेळाडू अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपल्या चमकदार कामगिरी ने आपले नाव राष्ट्रीय व आशियाई स्पर्धेत उंचावतो या गुणी खेळाडू च्या पाठीशी आमदार रोहित पवार ठामपणे उभे राहिले शुभम घोडेस्वार हा ओशन क्रिकेट अकॅडमी चा विद्यार्थी याची आर्यन्स क्रिकेट academy पुणे येथे सेलेक्शन झाले. यामध्ये आ रोहित दादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दादा त्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले.

साकेश्वर विद्यालय साकत चा हा विद्यार्थी राज्य आणि देश पातळीवर चमकदार कामगिरी करत त्यांने आपले नाव उंचावले आहे.

त्याला शाळेचे मुख्याध्यापक दत्ता काळे,
शिक्षक राजकुमार थोरवे, सुदाम वराट व डॉ. सुशील तांबे कोच ओशन क्रिकेट अकॅडमी व इतर शिक्षक व मित्रमंडळी यांचे मार्गदर्शन लाभले. तो सध्या ओशन क्रिकेट अकॅडमी जामखेड महाविद्यालय जामखेड येथे सराव करत आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

लवकरच तो रणजी क्रिकेट किंवा mpl खेळताना दिसेल त्याच्या निवडीबद्दल त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here