जामखेड ,पाटोदा व आष्टी तालुक्यात सीबीएसई बोर्ड मधून कालिका पोदार लर्न स्कुलची विद्यार्थींनी कु. गार्गी अवसरे 95.60% घेऊन 3 तालुक्यातून पहिला नंबर मिळविला.

0
104

जामखेड न्युज——

जामखेड ,पाटोदा व आष्टी तालुक्यात सीबीएसई बोर्ड मधून कालिका पोदार लर्न स्कुलची विद्यार्थींनी कु. गार्गी अवसरे 95.60% घेऊन 3 तालुक्यातून पहिला नंबर मिळविला.

जामखेड: जामखेड येथील सीबीएससी बोर्ड मान्यताप्राप्त कालिका पोद्दार लर्न स्कूलमध्ये यावर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परिक्षेमध्ये उत्कृष्ठ निकालाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही कायम ठेवली आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये कु. गार्गी अवसरे ९५.६०% प्रथम ,चि. श्रेयश राख ९४.४०% द्वितीय, तर चि. लाभेश चोपडा ९४.२०% तृतीय क्रमांक व एकूण ५८ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थ्यानी ८०% चा वर गुण मिळवून उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे.

याही वर्षी शाळेचे व्यवस्थापक या समवेत शाळेचे प्रिन्सिपल सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे हे यश सहज शक्य झाले असे सूर सर्व विद्यार्थी व पालकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे तसेच या यशाचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here