कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या पुण्यस्मणार्थ हभप प्रज्ञाचक्षू मुकुंद (काका) जाटदेवळेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाचे आयोजन
जामखेड तालुक्यातील साकत येथे कै. देवराव दिगांबर वराट (गुरूजी) यांच्या चतुर्थ पुण्यस्मणार्थ श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाचे आयोजित करण्यात आले असून कथाव्यास श्री हभप प्रज्ञाचक्षू मुकुंद ( काका) महाराज जाटदेवळेकर व हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर हे आहेत.
दैनंदिन कार्यक्रम
बुधवार दि. ३० एप्रिल २०२५ रोजी भागवत महात्म्य कथारंभ सायंकाळी ७.३० ते १०.३० पर्यंत
गुरूवार दि. १ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० पर्यंत नारदचरित्र श्री शुकागमन,
शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० नृसिंह अवतार,
शनिवार दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० वामन अवतार श्रीरामावतार,
रविवार दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० श्रीकृष्णलीला श्री गोवर्धन पुजन,
सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० रूक्मिणी स्वयंवर,
मंगळवार ६ मे २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० सुदामा पुजन व कथेची सांगता होईल.
तसेच मंगळवारी दि ६ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ राष्ट्रीय किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदी देवाची यांचे किर्तन होईल. तरी भाविक भक्तांनी भागवत कथेचा व किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा. अरूण वराट अध्यक्ष संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था साकत तसेच जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी केले आहे.