मोरे साहेबा बरोबरची काॅलेज जीवनातील निस्वार्थ मैत्री आजही टिकून – सभापती प्रा राम शिंदे सहकारात काम करणाऱ्यांसाठी मोरे साहेब आदर्श – माजी मंत्री सुरेश धस बबनराव मोरे यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न
मोरे साहेबा बरोबरची काॅलेज जीवनातील निस्वार्थ मैत्री आजही टिकून – सभापती प्रा राम शिंदे
सहकारात काम करणाऱ्यांसाठी मोरे साहेब आदर्श – माजी मंत्री सुरेश धस
बबनराव मोरे यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न
बबनराव अंगदराव मोरे यांच्या बरोबर श्रीगोंदा येथे काॅलेज मध्ये असताना निस्वार्थ मैत्री झाली ती आजही टिकून आहे. या मैत्री च्या प्रेमापोटी मी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मोरे यांची सुरवातीपासून सहकार्याची भुमिका होती. त्यामुळे सहकार क्षेत्रात इतके वर्षे एका जाग्यावर काम करणे सोपी गोष्ट नाही ती मोरे यांनी लिलया पेलली आहे. असे मत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.
बबनराव अंगदराव मोरे यांनी लेखा परिक्षक श्रेणी दोन पदावरून सेवानिवृत्त झाले यानिमित्त जामखेड येथील विठाई लाँन्स मध्ये सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, डॉ. भास्कर मोरे, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, अजय काशिद, सोमनाथ राळेभात, बापुराव ढवळे, एस. के. पोकळे, कदम साहेब, अरूण पडोळे, सौ. संध्याताई मोरे, वैभव मोरे, विजय मोरे, शालन मोरे,विकास वराट, आजबे सर, बी. बी.चाळक, सुर्यकांत कोकणे, ज्ञानदेव मुकणे, अंकुश उगले, बी. जी. शिंदे, शांतीनाथ आजबे, दादासाहेब वारे, गौतम उतेकर, घुमरे पाटील, एस. के पोकळे, सुहास वारे, अशोक मोरे, अमोल मोरे, शरद मोरे, वैभव मोरे, प्रणव मोरे, नाना मोरे, उमेश मोरे, प्रशांत मोरे, बबन मोरे, विलास मोरे, मिलिंद मोरे, बाळू मोरे, राजू मोरे तसेच जिल्हा विशेष लेखा परिक्षण वर्ग १ सह. संस्था कार्यालय बीड सर्व कर्मचारी वृंद, महाराष्ट्र राज्य संघटना को. आँप. आँडिट असोसिएशन, सर्व गट सचिव आष्टी, श्रीकृष्ण काँलनी जुना शिऊर रोड जामखेड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, मोरे यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करावे संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. बबनराव यांनी मोरे वारे यांना एकत्र आणले आहे. आता तर ते सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे फ्री टाइल ने काम करतील असे सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री सुरेश धस म्हणाले की, ३२ वर्षे एका क्षेत्रात काम करणे सोपी गोष्ट नाही ती मोरे यांनी केली आहे. सहकारात काम करणाऱ्या लोकांसाठी मोरे साहेब आदर्श आहेत. सध्या सहकार क्षेत्रात मरगळ आलेली आहे यात बीड जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हा बँकेच्या 95 पैकी 93 सनचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की. सध्या सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मरगळ आलेली आहे. सध्या नाविन्यपूर्ण सहकारी संस्था स्थापन होणे आवश्यक आहे. सेवा संस्था संचालक मंडळ पाहिले तर जास्तीत जास्त संचालक 55 च्या पुढील आहेता. सहकार कायद्यात कडक तरतुदी हव्यात असेही सांगितले. सध्या चे राजकारणी सहकाराला खाजगी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सहकारी ऐवजी खाजगी कारखाने वाढत आहेत.
यावेळी बोलताना बबनराव मोरे म्हणाले की, मी ३२ वर्षे प्रमाणिक व निस्वार्थ पणे सेवा केली. यामुळे आज सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यास माझ्या प्रेमापोटी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे.