श्री साकेश्वर केसरी बैलगाडा शर्यत बुधवारी साकतमध्ये जामखेड तालुक्यातील पहिलीच बैलगाडा शर्यत

0
1054

जामखेड न्युज—–

श्री साकेश्वर केसरी बैलगाडा शर्यत बुधवारी साकतमध्ये

जामखेड तालुक्यातील पहिलीच बैलगाडा शर्यत


श्री साकेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त तीन दिवस साकतमध्ये भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. सोमवार दि. १४ रोजी कावड मिरवणूक व श्री साकेश्वर महाराज जलाभिषेक, सायंकाळी शेरणी वाटप, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच छबिना मिरवणूक मंगळवार दि. १५ रोजी भव्य दिव्य असा महाराष्ट्रात शिस्तबद्ध म्हणून ओळखला जाणारा कुस्त्यांचा हगामा तर बुधवार दि. १६ रोजी जामखेड तालुक्यातील प्रथमच होत असलेली बैलगाडा शर्यत असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यात आतापर्यंत कोठेही बैलगाडा शर्यत झालेली नाही साकत येथे प्रथमच ती होत आहे. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी झाली आहे तसेच दोन दिवसात आणखी नावनोंदणी होणार आहे. परिसरातील नागरिकांना बैलगाडा शर्यत पाहण्याची उत्सुकता लागली आहे. यासाठी भव्य मैदान तयार करण्यात आले आहे.

एक आदत एक बैल श्री साकेश्वर केसरी बैलगाडा शर्यत होणार आहे विजेत्यास रोख बक्षीस तसेच दोन ढाल देण्यात येणार आहेत. नावनोंदणी साठी प्रवेश फी 700 रूपये आहे.

 

बक्षिसे

प्रथम क्रमांकास 51000 रूपये रोख व दोन ढाल सौजन्य अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर, द्वितीय क्रमांकास 31000 रूपये रोख व दोन ढाल सौजन्य अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर, तृतीय क्रमांकासाठी 21000 रूपये दोन ढाल सौजन्य अमोल वराट, चतुर्थ क्रमांकास 15000 रूपये दोन ढाल सौजन्य हायटेक नर्सरी अविन लहाने व युवराज वराट, पाचव्या क्रमांकासाठी 9000 रूपये व दोन ढाल सौजन्य आसराजी संतराम वराट यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील महादेव वराट, सहावा क्रमांक 7000 रूपये व दोन ढाल सौजन्य दत्तात्रय विठ्ठल वराट, सातवा क्रमांक 5000 रूपये व दोन ढाल सौजन्य केशव आनंदा वराट असे आहेत ढाल सौजन्य अनिलजी वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांचे आहे.

समालोचन म्हणून प्रविण घाटे पठारवाडी पुणे तसेच संपत वाघमोडे माळशिरस असतील.

नियम व अटी

१ ) शासनाच्या नियम व अटींचे पालन करुन मैदान होईल.
२) गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिठ्ठी टाकून होईल.
३) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे.
४) सर्व निकाल स्क्रीनच्या सहाय्याने दिले जातील.
५) मैदान रितसर आणि रास्तच होईल.
६) पंचाचा निर्णय हा अंतिम राहील.

नावनोंदणी साठी नंबर

 

नोंदणी – दि. ०५/०४/२०२५ ते १५/०४/२०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क 

श्री. अजित (दादा) वराट मो. 9552040037

श्री. राजु वराट (उपसरपंच) मो. 9096945040

डॉ. श्री. महादेव वराट (पोलीस पाटील ) मो. 9975698484

श्री. केशव वराट मो. 9689860610
श्री. अमोल वराट मो. 9529766030

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here