गोकुळ गायकवाड यांच्या ताटातूट कथासंग्रहास राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार गोकुळ गायकवाड यांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून साहित्य क्षेत्रात नवा लौकिक मिळविला
गोकुळ गायकवाड यांच्या ताटातूट कथासंग्रहास राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार
गोकुळ गायकवाड यांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून साहित्य क्षेत्रात नवा लौकिक मिळविला
ज्ञानज्योती मुक्ता साळवे बहुद्देशीय समाजसेवी संस्था संचलित मातंग साहित्य परिषद पुणे यांचे मार्फत आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड जि अहिल्यानगर येथील साहित्यिक गोकुळ श्रीरंग गायकवाड यांच्या ‘ताटातूट ” या कथासंग्रहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार २०२५ देवून गौरविण्यात आले
हा शानदार सोहळा पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली व मा सुनील वेदपाठक प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायालय नांदेड,मा मुकुंदराव कुलकर्णी,विधान परिषदेचे सदस्य आमदार अमितजी गोरखे, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रा डॉ धनंजय भीसे सर यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय विचार साधना सभागृह सदाशिव पेठ टिळक रोड पुणे. येथे पार पडला.
गोकुळ गायकवाड यांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करुन अगदी थोड्याच कालावधीत साहित्य क्षेत्रात नवा लौकिक मिळविला आहे.
त्यांच्या “धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा “या वैचारिक ग्रंथास १० “माझा गाव माझी माणसं” या चरित्र ग्रंथास ५ ताटातूट या कथासंग्रहास ८ आणि “वेदना” या काव्यसंग्रहाला २ असे राष्ट्रीय स्तरावरील ३, राज्यस्तरीय २० आणि स्थानिक जिल्हा पातळीवरील २ असे एकूण २५ साहित्य पुरस्कार मिळाले. ते उत्कृष्ट कविता सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करता.
गायकवाड यांच्या या कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.