जीवनात स्वयंम् शिस्तीसाठी एनसीसी महत्त्वाची, एनसीसीच्या माध्यमातून पोलीस व संरक्षण दलात अधिकारी बनावेत – राजेंद्र कोठारी राष्ट्रीय छात्र सेना “ए” प्रमाणपत्र नागेश विद्यालय वाटप.

0
229

जामखेड न्युज—–

जीवनात स्वयंम् शिस्तीसाठी एनसीसी महत्त्वाची, एनसीसीच्या माध्यमातून पोलीस व संरक्षण दलात अधिकारी बनावेत – राजेंद्र कोठारी

राष्ट्रीय छात्र सेना “ए” प्रमाणपत्र नागेश विद्यालय वाटप.

एनसीसीच्या माध्यमातून शिस्तप्रिय विद्यार्थी व नागरिक घडतात. विद्यार्थ्यांनी एनसीसी मध्ये जाऊन पोलिस विभाग व संरक्षण क्षेत्रात अधिकारी बनवून आई-वडिलांचे विद्यालयाचे व गावाचे नाव उंचवावे. एनसीसी विद्यार्थी नेहमीच समाजातील चांगल्या कार्यासाठी तत्पर असतात. असे मत राजेंद्र कोठारी यांनी व्यक्त केले.

रक्षा मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी ) ‘ए’ प्रमाणपत्र परीक्षा ज्यूनियर डिव्हिजन चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगरचे श्री नागेश विद्यालय युनिटचा शंभर टक्के निकाल लागला आहे. अ श्रेणीमध्ये 22 व ब श्रेणीत 1 विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालय मध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उपक्रम घेऊन एनसीसी ए प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस रा कॉ राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर ,विनायक राऊत,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका श्रीम भोर रोहिणी रमेश मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल बहिर , शिक्षक पालक संघ अध्यक्ष अशोक यादव, पर्यवेक्षक कोकाटे विकास, पर्यवेक्षक संजय हजारे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले, टीबी तालुका व्यवस्थापक दादासाहेब खाडे, पर्यवेक्षक अरुण घुंगरट,मझर खान,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल राख,समुपदेशक बंडे गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, रघुनाथ मोहोळकर ,सुदेश दुगम,संभाजी इंगळे,शिंदे बी एस नागेश कन्या विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

ह्यावेळी विद्यालयाच्या वतीने राजेंद्र कोठारी यांची उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

कन्या विद्यालय नूतन मुख्याध्यापिका श्रीमती भोर रोहिणी रमेश यांचा नागेश कन्या विद्यालय वतीने सन्मान करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते एनसीसी ए प्रमाणपत्र वितरित करून विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य मडके बी के यांनी टीबी रोगाविषयी सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना माहिती सांगून, आरोग्य संदर्भात विद्यार्थ्यांनी चांगली काळजी घ्यावी असे मार्गदर्शन केले. टीबी मुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी ऑफिसर मयूर भोसले तर सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन प्राचार्य मडके बी के यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार रोहित दादा पवार, कर्नल प्रसाद मिजार यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here