जामखेड न्युज——
साकतच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक वर्षापासून वानराची हजेरी
पहिल्या दिवशी हभप परमेश्वर महाराज केरूळकर यांची किर्तन सेवा संपन्न
महान संत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचे ४२ वर्षापूर्वी देहावसन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वानर आले होते. अंत्यसंस्कार होईपर्यंत होते दुसऱ्या दिवशी हस्ती गोळा करण्यासाठी पण ते हजर होते. अशा या महान विभुतीने साकतमध्ये वीनावादन व नंदादीप सुरू केला तसेच अखंड हरिनाम सप्ताह पण असतो तसेच त्याच्या पुण्यतिथी निमित्तही सप्ताह असतो दोन्ही सप्ताह साठी नित्यनेमाने दरवर्षी वानरराज हजेरी लावते सर्व ग्रामस्थ या वानरराजास गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज रूपाने हनुमंत राय पाहतात व भक्ती भावाने दर्शन घेतात.
आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हभप परमेश्वर महाराज केरूळकर श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची किर्तन सेवा होती किर्तन सेवेसाठी त्यानी
।। सुख वाटे हेचि ठायी । बहु पायी संतांच्या ।।1।।
।। म्हणउनि केला वास । नाही नाश तये ठायी ।।धृ।।
।। न करवे हालीचाली । निवारीली चिंता हे ।।4।।
।। तुका म्हणे निवे तनू । रजकणू लागता ।।3।। हा अभंग निवडला होता
स्पष्टीकरण- संत तुकोबांचे ध्येय पारमार्थिक सुख आहे आणि ते कूठे मिळेल,त्यासाठी काय करावे लागेल व त्या सुखाने नक्की काय होईल याविषयी त्यांना पूर्ण कल्पना आहे.
वरील अभंगातून महाराज सूचवितात की हे पारमार्थिक सुख संताच्या पायांपाशी विपुल प्रमाणात आहे.(आता पायापाशी सुख आहे याचा अर्थ त्यांचे पाय जीवी धरल्याशिवाय म्हणजेच त्यांना शरण गेल्याशिवाय ते मिळणार नाही हे उघड आहे.)
या सुखासाठी तुकोबांनी संतचरणावर भाव लीन केला आहे.संत उत्पत्तिनाशाच्या पलीकडे असल्यांमुळे त्यांच्याकडून प्राप्त होणार्या सुखाला सुद्धा नाश नाही,कालबाधा नाही हा त्यांचा निश्चय आहे
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. त्यांनी नैष्ठिक ब्रम्हचारी जीवन जगून अवीरथ भगवंत भक्ती केली. ब्रम्हचारी व्रताची पावती म्हणून अंत्यविधीला वानराच्या रूपाने हजर राहून स्वतः अस्ती बाजूला काढून रक्षा सावडली ते आजही नामसप्ताहमध्ये प्रत्यक्षात आठ दिवस वानर रूपाने हजेरी लावते. आज सुरू होणाऱ्या सप्ताह साठी आज सोमवार दि २४ रोजी हजेरी लावली आहे.