धनगर आरक्षणाबाबत राज्य शासन गंभीर नाही – पांडुरंग माने पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनाही विसर

0
389

जामखेड न्युज——

धनगर आरक्षणाबाबत राज्य शासन गंभीर नाही – पांडुरंग माने

पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनाही विसर


२०१४ च्या निवडणुक प्रचारादरम्यान पहिल्या
कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणून राज्यात मोठा गदारोळ माजवला होता. संपूर्ण भोळ्या भाबड्या धनगर समाजाने फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. आणि विशेष म्हणजे राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता आली. दहा वर्षे झाले तरी देवेंद्र फडणवीस यांना धनगर आरक्षणाचा विसर पडलेला आहे. लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून तहसीलदार गणेश माळी यांना सदस्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य पांडुरंग माने यांनी निवेदन दिले आहे.

धनगरांना आरक्षणापासून का वंचित ठेवलं आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. दहा वर्षे झाले तरी धनगर समाजाला का फसवत आहात. आरक्षणाबाबत आता का बोलत नाहीत. विरोधात असताना राज्यात रान उठवले होते आता राज्यात व देशात सत्ता असताना धनगर आरक्षणाचा का विसर पडला आहे. हे स्पष्ट करावे.

चार दिवसा पूर्वी खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता. आपण धनगर समाजाचा ६० वर्ष्याच्या धनगर ST आरक्षणाचा प्रश्न देशाच्या पार्लमेंट मध्ये मांडला. केंद्रीय मंत्री यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने मागणीच केलेली आहे. असे स्पष्ट सांगितले तेव्हा राज्य शासन धनगर समाजाला का फसवत आहे. हे स्पष्ट करावे. 

धनगर समाजाच्या वतीने पांडूरंग माने सदस्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य आपणास व सर्व सनानीय आमदार आणि खासदार तसेच जामखेड तालुका तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनास विनंती करतो कि, धनगर समाजाचा ST (अनुसूचित जमाती) मध्ये समावेश करण्याची मागणी आहे महाराष्ट्रातील धनगर समाज हा आपल्याला देशाला संविधान लागू झाल्यापासूनच महाराष्ट्रातील ST यादीमध्ये आहे.

परंतु या यादीमध्ये इंग्लिश भाषेमध्ये DHANGAD असा उल्लेख आणि मराठी मध्ये यादीतील ३६ नंबरवर धनगर असाच लिहलेला आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर राज्यपालांमार्फत केंद्राला दुरुस्तीची शिफारस करून महाराष्ट्रामधील धनगर सामाज्याला ST चे प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश केंद्राने राज्यशासनाला देऊन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी हि नम्र विनंती.

आणि पुन्हा एकदा सांगतोय धनगर समाजाची ST मध्ये समावेशाची मागणी नाही त्यामुळे अशी चुकीची मागणी कोणीही करू नये. केंद्राला राज्याने दुरुस्तीची शिफारस पाठवून लगेच अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने द्यावे हि मागणी (करावी) असे निवेदन पांडुरंग माने यांनी दिले आहे.

यावेळी धनगर समाज बांधवांनच्या वतीने
पांडुरंग माने, सदस्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे. यावेळी विनोद टकले, सचिन टकले हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here