आमदार रोहित पवारांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या, कर्जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील धक्कादायक निधनाबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, ही संपूर्ण राज्याची भावना असतानाच, या विषयावर सातत्याने आवाज उठवणारे कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
सत्य समोर आणण्यासाठी निर्भीडपणे लढा देणाऱ्या आ.रोहित पवार यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्यांना शासनाने तात्काळ ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवावी, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज मा. प्रांताधिकारी, कर्जत यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.
अजितदादांच्या अपघाती मृत्यूमागे केवळ अपघात आहे की कोणताही पूर्वनियोजित घातपात, याचा शोध लागणे ही जनसामान्यांची तीव्र इच्छा आहे. आ.रोहित पवार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या संवेदनशील विषयावर ठाम भूमिका घेत आहेत.
त्यांच्या या संघर्षामुळे हितशत्रूंकडून त्यांना संभाव्य धोका पोहोचू शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याची संवेदनशील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने ‘थ्रेट असेसमेंट’ करून त्यांना सर्वोच्च सुरक्षा पुरवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधीला संरक्षण मिळणे आवश्यक असून, या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करून शासन स्तरावर सकारात्मक शिफारस करावी, अशी आग्रही मागणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी नामदेव बापू राऊत, बाळासाहेब शिंदे (ता. अध्यक्ष NCP-AP), सौ. पूजाताई सूर्यवंशी (महिला ता. अध्यक्ष NCPSP), प्रीतीताई जेवरे, राजेंद्र भैय्या देशमुख, बाळासाहेब साळुंखे, गुलाब काका तनपुरे, रघु आबा काळदाते, विशाल मेहेत्रे, नितीन धांडे, राम कानगुडे, अजय नेवसे, उमेश परहर, डॉ. चंद्रकांत कोरडे, पप्पू शहाणे, अंगद रुपनर, बाळासाहेब सपकाळ, तात्यासाहेब ढेरे, अभय बोरा, रज्जाक भाई झारेकरी, डॉ. राजेंद्र पवार, ऋषिकेश धांडे, माऊली सायकर, प्रसाद जेवरे, ज्ञानदेव लष्कर, पोपट आबा खोसे, प्रकाश थोरात, अजित वांगडे, सावन शेटे, जयसिंग थेटे, दिलीप जाधव, राहुल नवले, राजेंद्र भांडवलकर, सचिन चव्हाण राहुल भोसले, दादा चव्हाण, रमेश कचरे, सुशील मराळ, राहुल नेटके, मुस्ताक सय्यद, संजय भिसे, सुमित भैलूमे, सागर सुर्वे, सौरव पाटील यांसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.