Monday, February 23, 2026
Home ताज्या बातम्या सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाने यांची पिंपळवाडी शाळेस आर्थिक मदत

सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाने यांची पिंपळवाडी शाळेस आर्थिक मदत

0
4

जामखेड न्युज—–

सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाने यांची पिंपळवाडी शाळेस आर्थिक मदत

 

आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अंगद नेमाने हे आपल्या गावी पिंपळवाडी येथे आले असता शाळेत गेले शाळेस सध्या रंगरंगोटी ची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन शाळेस दहा हजार रुपयांची मदत केली.

अंगद अरुण नेमाने ( API ) सौ. नेमाने कांचनताई नेमाने ( API ) यांनी आज पिंपळवाडी गावातील शाळेला भेट दिली असता, शाळेच्या रंगकामा करिता 10,000/- दिले. तसेच शाळेला भविष्यात आवश्यक ती मदत करू असे आश्वासित केले. यावेळी मुख्याध्यापक राम ढवळे व वर्षा जगताप मॅडम यांच्या कडे रक्कम हस्तांतरित केली.

माझ्या गावी माझी शाळा, ‘मला तिचा अजून लळा’ जर माणूस कितीही मोठा झाला तरी बालपणी बाळकडू घेतलेल्या शाळेला कधीच विसरता येत नाही. म्हणून अंगद नेमाने यांनी आपल्या शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत मदत केली आहे.

समाजात अनेक ठिकाणी माजी विद्यार्थी लहानपणी आपण शिकलेल्या शाळेला मोठी मदत देत असतात हे आपण पाहिलं आहे याचीच कास धरत जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी शाळेस अंगद नेमाने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दहा हजार रुपयांची रंग कामासाठी मदत केली आहे.

तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून पिंपळवाडी शाळेकडे पाहिले जाते. ग्रामस्थांनी या शाळेस मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आता शाळेचे माजी विद्यार्थीही उदार अंतःकरणाने मदत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!