नाहुली सोसायटी हिंसक वळणावर, अर्ज मागे घेतला नाही म्हणून हल्ला एक जखमी, चार जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

0
1447

जामखेड न्युज——–

नाहुली सोसायटी हिंसक वळणावर, अर्ज मागे घेतला नाही म्हणून हल्ला एक जखमी, चार जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल


नाहुली सोसायटीच्या निवडणुकीतील फॉर्म का काढुन घेतला नाही या कारणावरून चार जणांनी विजयी झालेल्या उमेदवाराच्या मुलावर भ्याड हल्ला केला. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला मारहाण व ॲट्रोसिटीसह चार जणांवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे युवा नेते संतोष गव्हाळे यांनी केली आहे.

याप्रकरणी सोपान गोरख जाधव, अशोक नवनाथ जाधव, बापुराव बाबासाहेब जाधव व विनोद दिलीप बहीर, सर्व रा. नाहुली ता. जामखेड जि. अहिल्यानगर अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी जामखेड तालुक्यातील नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवातीला नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तसेच विरोधकाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने दहावी जागाही बिनविरोध आली.

यानंतर राहिलेल्या तीन जागेसाठी निवडणुक झाली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने तीनही उमेदवार विजयी झाले. यामुळे एकुण तेरा च्या तेरा जागांवर विजय मिळवला. मात्र हा विजय विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

दि 15 मार्च 2025 रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादी बाळु खवळे हे त्यांच्या वस्तीवरील जयराम जाधव यांच्या वेल्डिंगच्या दुकानासमोर उभे होते. यावेळी गावातील सोपान गोरख जाधव, अशोक नवनाथ जाधव, बापुराव बाबासाहेब जाधव व विनोद दिलीप बहीर हे चार जण त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपी व गावातील काही ग्रामस्थ सोसायटीच्या मतदानाबाबत चर्चा करत होते. तेंव्हा फिर्यादीस आरोपी म्हणाले की तु तुझ्या वडिलांचा सोसायटीचा भरलेला अर्ज का काढुन घेतला नाही असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी फिर्यादी बाळु नामदेव खवळे यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींविरोधात मारहाण व ॲट्रोसिटीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करीत आहेत.

चौकट

पराभव सहन न‌ झाल्याने विरोधकांकडून विजयी उमेदवार पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला लोकशाहीला काळीमा फासवुन बाळासाहेब नामदेव खवळे यांच्यावर भ्याड हल्ला करणारांचा जाहीर निषेध करण्यात आला. नाहूली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादामध्ये विजयी उमेदवार पुत्राला मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपी अटक नाहीत त्यामुळे तातडीने आरोपींना अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे युवा नेते संतोष गव्हाळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here