जामखेड न्युज——
जामखेड प्रशासकीय विभागात शेकडो पदे रिक्त
आज वाचा तहसील कार्यालयात किती व कोणते पदे आहेत रिक्त
तालुक्यातील जनतेला विविध कामांसाठी तहसील कार्यालयाची पायरी चढावीच लागते. याशिवाय शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांची कामे, जमीन खरेदीविक्री, हरकती, अँफेडेव्हिट, विद्यार्थ्यांना- ज्येष्ठ नागरिकांना लागणारे विविध दाखले, ऐपतीचे दाखले, निवडणूक विभागात सुरू असलेले मतदार नोंदणी अभियान, मतदारयादीतून नाव कमी करणे आदी अनेक वेगवेगळी कामे तहसील कार्यालयामार्फत चालतात.
सध्या जामखेड तहसील कार्यालयात एकुण 77 पदांपैकी 27 पदे रिक्त आहेत. उपलब्ध 50 पदांपैकी काही रजेवर यामुळे कामकाज करताना तहसीलदार यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गौणखनिज परवाने, बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण ठेवणे, तालुक्यात होणारी मातीचोरी, मनोरंजन कर आकारणी, आरोपीची ओळख परेड आदी विविध प्रकारची कामे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून केली जातात.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या निवडणुकीचे नियोजनही तहसील कार्यालयाच्या माध्यमातूनच केले जाते. इतका कामाचा ताण असतानाही अनेक पदे रिक्त असल्याने काम करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
जामखेड तहसील कार्यालयात सध्या एकूण 77 पदे आहेत यापैकी 27 पदे रिक्त आहेत.
मंजूर पद भरलेले पद रिक्त पद
तहसीलदार 01 01 00
निवासी नायब
तहसीलदार 01 01 00
महसूल नायब
तहसीलदार 01 01 00
अव्वल कारकुन 03 01 02
महसूल सहाय्यक 10 04 06
शिपाई 04 01 03
स्वच्छक 01 01 00
पहारेकरी 01 00 01
वाहन चालक 01 00 01
निवडणुक नायब
तहसीलदार 01 01 00
महसूल सहाय्यक
निवडणुक 01 00 01
नायब तहसीलदार
संगायो 01 01 00
अव्वल कारकुन 01 01 00
महसूल सहाय्यक
संगायो 01 00 01
अव्वल कारकुन
इंगायो 01 01 00
महसूल सहाय्यक
इंगायो 01 00 01
शिपाई संगोई 01 00 01
पुरवठा निरिक्षक
अधिकारी 01 00 01
पुरवठा निरीक्षक 01 00 01
पुरवठा गोदाम
व्यवस्थापक 01 01 00
गोदाम लिपीक 01 01 00
पुरवठा लिपीक 01 01 00
शिपाई 01 00 01
गोदाम पहारेकरी 01 00 01
तलाठी 39 33 06
एकुण 77 50 27
एकुण पदे 77 भरलेली पदे 50 तर रिक्त पदे 27 आहेत.