जामखेड नगर रोडवरील चंदन प्लास्टिक कंपनीला आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान
नगर जामखेड रस्त्यावरील विश्वकर्मा काॅलेज शेजारी सारोळा बद्दी येथे महामार्गालगत असलेल्या चंदन प्लास्टिकच्या गोडाऊनला (Chandan Plastic Warehouse Fire) रविवारी सकाळी भीषण आग लागली. यात आतील प्लास्टिक जळून खाक झाले
आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोडाऊनला वेधले. आगीत गोडाऊनमधील माल जळून खाक झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर मनपा (Ahilyanagar Manapa) व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाने (MIDC Fire Brigade) घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्लास्टिक पिशव्या, ताडपत्री व अन्य प्लास्टिक वस्तू बनवल्या जात होत्या
गोडाऊनमधून धुराचे लोट दिसताच अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग (Short Circuit Fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच विलास गुंदेचा व रमेश गुंदेचा घटनास्थळी दाखल झाले. दुपारपर्यंत आग आटोक्यात येत नव्हती प्लास्टिक मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता.
उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीचे लोट च्या लोट निघत होते परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.