Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत रक्तदान शिबीरात 134 रक्तदात्यांनी रक्तदान करून...

जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत रक्तदान शिबीरात 134 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन

0
767

जामखेड न्युज——

जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत रक्तदान शिबीरात 134 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले  

 

गेल्या तेरा वर्षापासून महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तीन दिवसीय कार्यक्रमाची आज सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराने सुरूवात झाली यावेळी 134 रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

अहिल्यानगर ब्लड बँक व जगदंबा प्रतिष्ठान तसेच महिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिराचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी संजय काशिद, कॅप्टन लक्ष्मण भोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, युवा नेते सुरज काळे, बाळू बोथरा, युवा नेते निलेश जाधव, डॉ. अशोक बांगर, माऊली अंदुरे, संजय राऊत, सुनील यादव, अवी बेलेकर, प्रा. कैलास माने, पप्पू काशिद, विजय काशिद, संजय बेलेकर, आकाश बारहाते, सागर सदाफुले, संतोष गव्हाळे, रक्तदान शिबीरासाठी अहिल्यानगर ब्लड बँकचे डाॅ.रामदास शेवाळे, संदीप हजारे, संजय मुळे, दिगंबर माळवे, सिध्दांत शेवाळे, धनश्री आरंगळे, सानिया पठाण,प्रिती ढोबळे, कोमल गव्हाळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबीर, नाट्य स्पर्धा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान याच बरोबर आदर्श पुत्राला घडविणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून रक्तदात्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 134 रक्तदात्यांची रक्तदान केले.

आरोग्य बिघडून टाकणाऱ्या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात शरीर कमावून देणारे मर्दानी खेळ जसे दुर्लक्षित होते गेले. तसेच युध्दकला आणि शस्त्रांशी असलेले नातेही पुसट होत गेले. हेच नाते घट्ट कऱण्यासाठी जामखेड येथे महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता भगिनी यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच महिला शिवजन्मोत्सव समिती रोहिणीताई संजय काशिद यांनी स्थापन करून गेल्या तेरा वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षीही तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

१६ मार्च रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबीर सायंकाळी सात वाजता तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उद्या सोमवारी १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता भव्य महिला रँली छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बीड रोड, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक सायंकाळी सात वाजता शिवरायांनी महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा. शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद होईल

१८ मार्च रोजी भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत
भव्य मिरवणूकीत ऐतिहासिक, पारंपरिक वेशभूषा असणाऱ्या तीन महिलांना लकी ड्राँ मार्फत तीन आकर्षक भेट वस्तू मिळतील स्थळ लक्ष्मीआई चौक संविधान चौक जामखेड जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या तेरा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!