जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालीका सुरूच
बीड रोडवरील अपघात एक जण गंभीर जखमी, जखमीला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तातडीची मदत
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग हा अपघात मार्ग म्हणून उदयास येत आहे. पंधरा दिवसांत हा तिसरा अपघात आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यात राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या काही चुकीमुळे अपघात होत आहेत.
आज रविवार दि. ९/३/२०२५ सकाळी ११ वाजता मोटरसायकल व टेम्पोची धडक होऊन कैलास प्रल्हाद सुतार वय ५५ मुक्काम धोत्री तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हे जखमी झाले असून त्यांना ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णूवाकेतून जामखेड येथील खाजगी रुग्णालयात अँडमीट केले संजय कोठारी यांना दत्ता चव्हाण आणि महेंद्र क्षीरसागर यांनी मदत केली.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून खुपच धिम्या गतीने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यावर दिशादर्शक फलक, पांढऱ्या पट्ट्या, दुभाजक, रेडीयम यांची वानवा आहे. सिमेंट रस्ता झालेल्या बाजूला गटारापर्यत डांबरीकरण रस्ता आवश्यक आहे तो कुठेही केलेला नाही. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
24 फेब्रुवारी रोजी इर्टिगा गाडी डिव्हायडरवर धडकून गाडीने पेट घेतल्या ने दोघांचा जळून मृत्यू झाला होता हा अपघात कॉन्ट्रॅक्टरच्या चुकी मुळे अपघात होवुन महादेव काळे व धनंजय नरेश गुडवाल मेजर यांचा मृत्यु झालेला होता. यामुळे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा कुटुबांसमवेत अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
तसेच दोन तारखेला एक अपघात होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले होते. आज पुन्हा अपघात झाला आहे. यामुळे जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अपघात मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे ताबडतोब काम पूर्ण करून सिंमेट रस्ता ते गटार डांबरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यावर दिशादर्शक फलक, रेडीयम, पांढऱ्या पट्ट्या हे सगळे आवश्यक आहे.