लोणीचे सरपंच रघुनाथ परकड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार प्रदान
जामखेड तालुक्यातील लोणी येथील युवा सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड यांनी गावच्या विकासासाठी केलेल्या महत्वपूर्ण कामाची दखल घेत स्वराज सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव केला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून सरपंच परकड यांची ओळख आहे. गावचा विकास हाच ध्यास घेऊन गावच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात, गावात स्वच्छता, ग्रामविकास, पाणीपुरवठा, पर्यावरण रक्षण, रस्ते यासारखे दर्जेदार काम करून एक आदर्श निर्माण केला आहे. याच कामाची दखल घेत आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.
आज 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता माऊली संकुल सावेडी अहिल्यानगर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते गावच्या मुख्यमंत्र्याचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सन्मान पत्रात म्हटले आहे की, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा..सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५ विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या व्यक्तीला दरवर्षी दिला जातो.
आपण आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करुन समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपड करत आहात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संघर्षातून मिळणारे यश मोठे आहे. यामुळे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वा.माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न झाला. आपल्याला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा…
॥ सन्मानपत्र |
ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन| आपण गावचा विकास करण्यासाठी प्रशासनतसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य| जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळविला आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या| वतीने आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने| आपणास सन्मानित करण्यात येत आहे.आपण आपल्या पुढील काळातही असे| सामजिक कामे करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो.| आपल्या पुढील भावी कार्यास सरपंच सेवासंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..! असे सन्मान पत्रात म्हटले आहे.