रयत शिक्षण संस्थेचे मा. सहसचिव एम. के. भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बरोबर काम

0
993

जामखेड न्युज——

रयत शिक्षण संस्थेचे मा. सहसचिव एम. के. भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन

रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बरोबर काम

रयत शिक्षण संस्था, साताराचे मा.सहसचिव तथा जनरल बॉडी सदस्य एम.के.भोसले यांचे आज रविवार दि. 9 रोजी सकाळी 10.45 वाजता वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी 5.00 वा. अमरधाम, तपनेश्वर रोड, जामखेड येथे होईल.

रयत शिक्षण संस्थेत शिक्षक, प्राचार्य ते सहसचिव जनरल बाँडी सदस्य पर्यंत काम केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बरोबर संस्था विकासासाठी काम केले होते. जामखेड सारख्या ग्रामीण भागातून रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव पदापर्यंत गेले होते. रयत शिक्षण संस्थेत त्यांचा वेगळाच दबदबा होता.

एम. के भोसले यांच्या मागे एक मुलगा दोन मुली विवाहित असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कार सांयकाळी पाच वाजता तपनेश्वर जामखेड येथे होईल.

कर्मवीर भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारे घेऊन जाण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. महाराष्ट्रात ४ जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत यात कर्मवीर भाऊराव पाटील बरोबर एम के भोसले यांनी काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here