बीड कॉर्नर ते विश्वक्रांती चौक रस्त्याचे कामसुरू होणार
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नाला यश
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन चार दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन धनेश्वर कंट्रक्शनचे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगोली यांनी दिले आहे.
संजय कोठारी यांच्या नेहमीच्या रोडच्या तक्रारीबाबत त्वरित दखल घेऊन धनेश्वर कंट्रक्शन चे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगोली यांनी कोठारी यांच्या ऑफिसमध्ये येऊन चर्चा करून दोन दिवसात बीड रोड कॉर्नर ते विश्वक्रांती चौक काम चालू करणार अशी माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगोले यांनी दिली.
दोन वर्षापासून डी 548 जामखेड सौताडा मार्गाचे काम रखडले आहे नेहमीच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे सर्व बाबतीत कोठारी यांनी आवाज उठवला होता या आवाजाचे आज धनेश्वर कंट्रक्शन दखल घेऊन कोठारी यांच्या ऑफिसमध्ये येऊन राष्ट्रीय महामार्ग बाबतीत सविस्तर चर्चा केली.
यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगोले, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन पवार, लाईझनिंग ऑफिसर वसंत झीने यांनी येऊन कोठारी यांना हा सर्व हकीगत सांगितली यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, किरण रेडे, अविनाश बोधले, पप्पू भाई सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी कोठारी यांच्या सर्व तक्रारी ऐकून त्यांनी तक्रारीचे निवारण करत आम्ही दोन-चार दिवसात काम चालू करतो परंतु आम्हाला प्रशासनाची मदत लागेल म्हणजेच पोलीस प्रशासन, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांची आम्हाला मदत लागणार आहे.
रोडचे काम करत असताना आम्ही कोणावरही अन्याय करणार नाहीत अतिक्रमण असेल त्याची त्यांनी काढून घ्यावे आणि रोड झाला तरच धुळीचे प्रमाण कमी होणार आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, बऱ्याच दिवसापासून मी वारंवार तक्रारी करत असून तुम्ही दुर्लक्ष केले आहे आता आम्ही कोणत्याही प्रकारे ऐकणार नाही ताबडतोब रोडचे काम करून कोणावरही अन्याय होणार नाही अशा दृष्टीने रोडचे काम करून जामखेड करांचा श्वास मोकळा करावा अशी मागणी केली.