गेल्या अडीच वर्षांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिने काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना तीस महिने झाले तरी अपुर्ण काम आहे. काही ठिकाणी अर्धवट काम त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. रेडियम नाहीत. यामुळे अनेक अपघात होतात. मध्ये भागी डिव्हाइडर न दिसल्याने गाडी डिव्हाइडर वर धडकली याचवेळी गाडीने पेट घेतला आणि गाडीतील पोलीस धनंजय गुडवाल व व्यावसायिक महादेव काळे गाडीत जळुन कोळसा झाला होता याबाबत जामखेड न्युजने ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अपघात दिशादर्शक फलक, रेडियम, काम चालू फलक नाहीत अशी बातमी लावली होती. ठेकेदाराने ताबडतोब दिशादर्शक फलक, काम चालू वाहने सावकाश चालवा, रेडियम लावले आहेत. आपल्या बातमीचा इफेक्ट अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्या मध्ये रस्त्या दुभाजकाला इर्टिगा गाडी धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडी व गाडीतील दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता.
सदरची दूर्दैवी घटना दि २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ सागर शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते.
जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले मात्र तोपर्यंत गाडीने पुर्ण पेट घेतला होता. गाडीत जळुन मृत्यू झालेल्या मध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल व जामखेड मधील साईनाथ पाँन शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश असल्याचे समजते. गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचाटायर १००-१५० फुटावर फेकले गेले होते.
इर्टिगा गाडी अत्याधुनिक पध्दतीची असल्याने गाडी लाँक झाली त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आले नाही. गाडीबरोबर तेही इतक्या भयानक प्रकारे जळाले आहेत शेजारी पोलीस धनंजय गुडवाल यांचा मोबाईल पडलेला होता त्यामुळे ते एक असावेत व गाडी मालक काळे असे दोघे होते. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
दोन वर्षापासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अपुर्ण काम
दोन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात यामुळे च वेगाने असलेली गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.