जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -( सुदाम वराट)
महाराष्ट्राची लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांनी कोरोणाच्या महामाच्या काळात मतदारसंघात व महाराष्ट्रात केलेल्या सर्व सामाजिक कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट ने सन्मानित केले आहे,त्यामुळे आमदार रोहित दादा पवार यांचा यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजला आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे जगभरातील शंभर देशांमध्ये ग्लोबल प्लीज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे याअंतर्गत किरोनाच्या काळात प्रभावी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे सदर जागतिक उपक्रमात आमदार रोहित पवार यांचे कार्य देखील नोंदवले गेले आहे.
वर्ल्ड बुक ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद, वर्ल्ड बुक रेकॉर्ड चे होल्डर आदम सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, या पुरस्कारामुळे कर्जत-जामखेड मतदार संघात आनंद व्यक्त केला जात असून आमदार पवार यांचे जनतेतून अभिनंदन होत आहे.
गेली दीड वर्षापासून आमदार रोहित पवार यांनी कर्जत व जामखेड येथे दोन जम्बो कोरोनाचे सेंटर उभारून रुग्णांना मोफत जेवण औषधोपचार देण्यास प्राधान्य दिले त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्स्टट्रेक्टर मशीन, सॅनिटायझर, कोरोना सेफ्टी किट, म्युकरमायकोसिस वरील औषधे, मास्क, क्लोज मतदार संघात तर दिलेच परंतु महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोच केले तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोणाची उपकरणे व कर्जतमध्ये 250 ऑक्सीजन सिलेंडर व जामखेड येथे 125 ऑक्सीजन सिलेंडर निर्मिती ऑक्सिजन हब निर्मिती प्रकल्प निर्माण करून त्याचा फायदा पुढील काळात रुग्णाना होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच कोरोना ग्रस्तांसाठी मानसिक आधार देण्याचे काम तसेच त्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून वैद्यकीय सेवा सेवा मध्ये अमुलाग्र बदल केला त्याचबरोबर कोरोणाच्या संकट काळात कोविड सेंटरला सतत भेटी देऊन रुग्ण लवकर कसा बरा होईल या बाबत स्वतः जातीने लक्ष घातले या सर्व कामांची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने आमदार रोहित पवार यांचा गौरव केला आहे.