कर्तव्य म्हणून श्री शिवप्रतिष्ठान जामखेडचे धारकरी धावले पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

0
280

जामखेड प्रतिनिधी

       जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही केवळ एक संघटना नसुन ती हिंदुस्थानातील एक राखीव फौजच गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजींनी तयार केलेली आहे देव, देश व धर्मासाठी जगायच, समाजहित व राष्ट्रहिताची शिकवण दर वर्षी च्या गडकोट मोहीमेत सर्व धारकर्यांना दिली जाते. या हिंदुस्थानावर कोणतेही संकट आले की श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आपल्या सैनिक व पोलिस बांधवांसोबत खांद्याला खांदा देऊन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सदैव मदतीसाठी तत्पर असते. या वर्षी कोल्हापूर,सांगली, रायगड या ठिकाणी आलेल्या महाभयंकर पुरात देखील जामखेड तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुराजे भोसले व ईतर धारकारी देशासाठी जगायचं रं! शिवबान सांगावा धाडलायरं!! हे गीत म्हणत तेथील नागरीकांच्या मदतीला ताबडतोब धावले.
जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते मदतीच्या गाडीचे पुजन करुन जामखेडकरांची मदत तातडीने पुरग्रस्तांसाठी रवाना झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील खोची व घुमकी या गावात जाऊन तेथील नागरिकांना गहु, तांदुळ, साखर, ज्वारी, तेल या प्रकारे अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले व त्यांना धीर देण्यात आला घाबरू नका हताश होऊ नका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या सोबत आहे कसलीही मदत लागली फक्त एक आवाज द्या आम्ही सर्व शिवरायांचे मावळे आपल्या मदतीसाठी तयार आहोत. यावेळी ता. हातकणंगले जि कोल्हापूर मधील खोची गावचे संरपंच जगदीश पाटिल यांनी तुम्ही तातडीने आमच्या मदतीला धावले व आम्हाला धीर दिला म्हणून श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांचे कौतुक केले आणि भिडे गुरुजींचे धारकरी संकटसमयी तत्पर असतात व वेळोवेळी धावुन येतात या बद्दल धन्यवाद देखील दिले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी पांडुरंग भोसले म्हणाले ज्या ज्या वेळी महाराष्ट्रवर संकट येईल व आपले बांधव संकटात असतील त्या त्या वेळी सर्वांनी मदतीला धावुन गेलच पाहिजे राष्ट्रहितासाठी आपन सर्व तरुणांनी सदैव जागृत असायला पाहिजे. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींच्या विचारानेच जगला पाहिजे. कसलेही संकटे पराभुत करण्याची शक्ती श्री. शिवाजी व श्री. संभाजी या महामंत्र मध्ये आहे व हिच शिकवण आम्हांला आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी दिलेली आहे. स्वतासाठी न जगता राष्ट्रहितासाठी जगल पाहिजे ही प्रेरणा घेऊनच आंम्ही तुमच्या मदतीला धावलो. मागच्या पुराच्यावेळी देखील जामखेड तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात मदत करण्यत आली होती आणि अशी परस्थिती कधीही परत ओढवु नये परंतु ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट असेल त्या त्यावेळी आम्हीं गुरूजींचे धारकरी मदतीला हजर असु हिच शिदोरी गडकोट मोहित महाराजांच प्रतिरुप असलेल्या सह्याद्रीतुन आम्ही शिकलो.
सागंली कोल्हापूर रायगड या जिल्ह्यात पुरपरस्थिती मुळे अनेक कुटंब पाण्यात गेली दरडी कोसळुन अनेकांच मुत्यही झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पवार, आशोक राळेभात, नाना खंडागळे, गोकुळ म्हेत्रे, शरद फरांडे, व आदित्य थोरात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here