जामखेड न्युज – –
“माझी वसुंधरा” अभियानात मिरजगाव. ता. कर्जत. जिल्हा अहमदनगर या ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. मिरजगावला या अभियानात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. पर्यावरण दिनानिमित आयजित कार्यक्रमात ऑनलाईन सन्मान सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पर्यावन मंत्री आदित्य ठाकरे राज्यमंत्री श्री संजय बनसोडे आदींच्या उपस्थित पार पडला.
पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. कर्जत जामखेड विधान सभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यासह मिरजगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांनी ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, नितीन खेतमाळास ,परमवीर पाडुळे, बापू कासव शहाजी कर्पे उपस्थित होते
पर्यावरण मंत्री काय म्हणाले?
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की गावांची निसर्गाशी असलेले कटिबध्द ता निश्चित करण्यासाठी आणि पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंच तत्वांवर आधारित निसर्ग पूरक जीवनपद्धतीचा प्रसार करण्यासाठी “माझी वसुंधरा” अभियान राबविण्यात येत आहे
आमदार रोहित पवार यांचे मार्गदर्शनाखाली मिरजगाव ग्रामस्थांनी विविध उपक्रांद्वारे राज्यात दुसरा क्रमांक मिळालेबद्दल ग्रामस्तचे कौतुक करून पुढील काळातही ग्रामपंचायतीचे माध्यमातून पर्यावरण सर्वधन करणेसाठी चळवळ उभारणार असल्याचे सांगितले कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सर्वाचा आहे या अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आपले योगदान दिले. त्यांनी घेतलेले परिश्रम आणि सहकार्य यातून हे यश प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन मिरजगावच्या सरपंच सुनीता खेतमाळीस यांनी केले.