पसंती ठरली मात्र, मुलाचा ‘सिबील’ खराब असल्याने मोडला विवाह!

0
1821

जामखेड न्युज——

पसंती ठरली मात्र, मुलाचा ‘सिबील’ खराब असल्याने मोडला विवाह!

ग्राहकाला कर्ज देताना बँका ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबील स्कोअर’चा विचार करतात. सिबील चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबील खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो. वेळप्रसंगी खराब सिबील स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.

मूर्तिजापूर जि. अकोला शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुला-मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. पसंती ठरली, आदीबाबत चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली. बैठकीला मुलीचे मामा सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मुलाचा सिबील स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. सिबील स्कोअर तपासला व आश्चर्याचा धक्का बसला.

आर्थिक साक्षरतेचा धडा…

सिबीलच्या माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद पुढे आल्याने त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा बोलता आले नाही. मात्र, बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेबाबतचा धडा यातून मिळाला.

…तर मुलगी का द्यावी?

मुलाचा सिबील स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले. मुलाने आतापर्यंत कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले, याचा तपशील सिबीलद्वारे सर्वांपुढे आला.

नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले. मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर, मुलगी का द्यावी, असे मामा म्हणाले.

चौकट

सिबिल चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबील खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो. वेळप्रसंगी खराब सिबिल स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळच म्हणावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here