गोकुळ गायकवाड यांच्या ‘ताटातूट’ कथासंग्रहाला अखिल भारतीय पातळीवरील साहित्य पुरस्कार प्राप्त
जामखेड येथील साहित्यिक गोकुळ श्रीरंग गायकवाड यांच्या ‘ताटातूट’ कथासंग्रहाला ९ फेब्रुवारी २०२५ रोजी बडोदा मराठी वाड्मय परिषदेने आयोजित केलेल्या ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विचारवंत डॉ उदय निरगुडकर यांचे शुभहस्ते आणि बडोदा मराठी वाड्मय परिषदेचे अध्यक्ष मा. मिलिंद बोडस , सचिव मा. संजय बच्छाव, कोषाध्यक्ष मा शशांक केमकर,
यांच्या प्रमुख उपस्थितीत गुजरात राज्यातील (बडोदा) वडोदरा येथील महाराणी चिमणाबाई हायस्कूलच्या प्रांगणात साहित्य गोकुळ गायकवाड जामखेड जि अहिल्यानगर यांच्या ,’ ताटातूट’ कथासंग्रहास अखिल भारतीय पातळीवरील मराठी साहित्य पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.
ह्या ऐतिहासिक पुरस्कार वितरण सोहळ्यात संदेश घायतडक,व संभाजी आव्हाड उपस्थित होते.
गोकुळ गायकवाड यांच्या ‘ताटातूट ‘ या कथासंग्रहाला यापूर्वी पाच राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारां बरोबरच परराज्यातील राष्ट्रीय स्तरावरील साहित्य पुरस्कार प्राप्त झाले बद्दल गोकुळ गायकवाड यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.