जामखेड महाविद्यालयात स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

0
1404

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयात स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

 

जामखेड महाविद्यालय जामखेड मध्ये स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा बुधवार दि. 12 रोजी सकाळी 10.00 वा. सी. व्ही रमण सभागृह जामखेड महाविद्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात आली आहे तरी राज्यभरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक जामखेड महाविद्यालय जामखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटक मा. डॉ. अजयकुमार लोळगे मा. विशेष कार्यकारी अधिकारी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळ पुणे समारोप अध्यक्ष मा. अरूणकाका चिंतामणी उपाध्यक्ष दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड असतील तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये अरूणकाका देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख असतील.

स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या१३ वर्षापासून आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सदर स्पर्धा बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे.जामखेड आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली करण्यासाठी तत्कालीन समाज धुरीणांमध्ये अग्रणी असलेले थोर देशभक्त व स्वातंत्र्यसेनानी कै. मधुकाका देशमुख यांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातो. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता जपण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात.

त्यांच्या या स्मृतीचा ठेवा पणतीच्या रुपाने शिक्षण क्षेत्रात चिरंतन जपावा, या भावनेने देशमुख कुटुंबीयांच्या व कै. मधुकाकांच्या कार्यावर अढळ निष्ठा असणाऱ्या सर्वांच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केलेले असून स्पर्धेसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील दोन स्पर्धक पाठवावे, ही नम्र विनंती जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य एम. एल. डोंगरे यांनी केली आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके

प्रथम क्रमांकास ७००१/- स्मृती चिन्ह+ सन्मानपत्र
द्वितीय ५००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
तृतीय ३००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
उत्तेजनार्थ १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र
उत्तेजनार्थ – १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

स्पर्धेचे विषय

१. माध्यमांचा समाज जीवनावरील परिणाम२. वाचन संस्कृती व प्रसारमाध्यमे३. कृषीक्षेत्राची सद्यस्थिती आणि आव्हाने४. व्हीजन भारत २०२९

५. कृत्रीम बुध्दीमत्ता (AI)… मानवी जीवनासाठी तारक की मारक
६. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० : वास्तव व अपेक्षा

गुणदानाचे निकष

१) प्रस्तावना १० गुण, २) आशय / विषय १० गुण,
३) नव विचार १० गुण, ४) अभिव्यक्ती १० गुण,
५) भाषा शैली १० गुण,

स्पर्धेचे नियम

१. स्पर्धेत महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.

२. स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
३. सामाजिक, धार्मिक भावना दुखवणारा मजकूर
नसावा.
४. स्पर्धकांनी दि. ११/०२/२०२५ पर्यंत नोंदणी फॉर्म सोबतच्या लिंकवर भरावा.
५. स्पर्धे संदर्भात नियम, निकष यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संयोजन समितीने राखून ठेवलेले आहेत.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
७. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक कोणत्याही महाविद्यालयाचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सहभागाबाबतचे पत्र अथवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
८. सर्व सहभागी स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेतील सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
९. प्रत्येक स्पर्धकास ७ मिनिटे (५ + २) वेळ दिला जाईल.
१०. स्पर्धकांना प्रवास खर्च दिला जाणार नाही.

तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जामखेड महाविद्यालय जामखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here