RSP जिल्हा उपसमादेशकपदी प्रकाश मिंड तर जामखेड समादेशक पदी शंकर खताळ यांची निवड

0
682

जामखेड न्युज——

RSP जिल्हा उपसमादेशकपदी प्रकाश मिंड तर जामखेड समादेशक पदी शंकर खताळ यांची निवड

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन अहिल्यानगर च्या वतीने रेसिडेन्शिअल हायस्कुल नगर येथे पार पडलेल्या RSP च्या वार्षिकसभे मध्ये अहिल्यानगर जिल्हाच्या उपजिल्हा समादेशक पदी नंदादेवी विद्यालय नान्नज चे शिक्षक श्री प्रकाश मिंड सर यांची निवड व जामखेड तालुका समादेशक पदी श्री. विंचरणा विद्यालय पिंपरखेड चे मुख्याध्यापक श्री.शंकर खताळ यांची निवड करण्यात आली.

प्रकाश मिंड व शंकर खताळ यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अहिल्यानगर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय अशोक कडूस, जिल्हा लेखाधिकारी मनोज शिंदे, अहिल्यानगर जिल्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, आरटीओ माननीय श्रीमती प्रियंका उनवणे, विभागीय समादेशक सिकंदर शेख, जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पोकळे, अतिरिक्त समादेशक डोफे , उपसमादेशक प्रकाश मिंड व बहुसंख्य RSP आधिकरी उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील ल ना शाळेचे राघवेंद्र धनलगडे, साहेबराव पाटील विद्यालाचे दादासाहेब मोहिते, अनखेरी देवी विद्यालय फक्राबद शाळेचे विर सर, अरण्येश्वर विद्यालीचे चांगुने सर. खर्डा न्यू इंग्लिश स्कूलचे केंद्रे सर, छत्रपती शिवाजी विद्यालय जवळाचे भंडारे सर व इतर सर्व तालुक्यातील RSP अधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.

प्रकाश मिंड व शंकर खताळ यांच्या निवडीचे संपूर्ण तालुक्यातून स्वागत होत आहे. तसेच विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरखेड चे अध्यक्ष दिगंबर ढवळे, सचिव भाऊसाहेब ढवळे व सर्व शिक्षक व नान्नज, पिंपरखेड ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

शाळा तेथे RSP युनिट सुरू करण्याचे नियोजन लवकरच चालू करण्याचे नियोजन या प्रसंगी ठरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here