जामखेड न्युज——
जामखेड कालिका पोदार स्कूल मध्ये अभिरुप संसद सत्र साजरे
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमचे सादरीकरण हेच तर कालिका पोदार लर्न स्कूलचे खास वैशिष्ट्य .शाळेत शिकत असताना समाजातील विविध गोष्टींचा त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या हेतूने नुकतेच कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये अभिरुप संसद सत्राचे चित्तथरारक आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. निलेश तवटे व श्री. सागर अंदुरे प्राचार्य श्री प्रशांत जोशी ,शिक्षकवृंद व पालकवर्ग उपस्थित होते.संसदेच्या सत्रात लोकशाहीचा थरार अनुभवावा, जिथे विद्यार्थी संसदपटूंची भूमिका घेतात, वादविवाद करतात, चर्चा करतात आणि आपल्या जगाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतात