Home ताज्या बातम्या जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर अध्यक्षपदी अँड. हर्षल डोके...

जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर अध्यक्षपदी अँड. हर्षल डोके तर उपाध्यक्षपदी घनश्याम राळेभात, सचिव शिवाजी लटपटे तर खजिनदार सागर मोरे

0
4

जामखेड न्युज—–

जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर

अध्यक्षपदी अँड. हर्षल डोके तर उपाध्यक्षपदी घनश्याम राळेभात, सचिव शिवाजी लटपटे तर खजिनदार सागर मोरे

जामखेड वकील संघाची सन 2026-2027 या वर्शासाठी दिनांक 26/02/2026 रोजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव, खजिनदार व ग्रंथपाल या पदा करीता निवडणुक पार पडली. निवडणुकी मध्ये अध्यक्ष म्हणुन अड.हर्षल एन.डोके यांची व उपाध्यक्ष म्हणुन अँड. घनःशाम एम.राळेभात यांची बहुमताने निवड झाली, सचिव पदी अँड.शिवाजी आ. लटपटे व खजिनदार पदी अँड.सागर मोरे, यांनी देखील बाजी मारलेली आहे.

तसेच ग्रंथपाल पदी अँड.एच.डी.सपकाळ व महिला सचिव पदी अँड.वैष्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड झाली,
वरील पदासाठी मतदान घेण्यात येवुन
अध्यक्षपदी अँड.हर्शल एन.डोके व उपाध्यक्षपदी अँड.घनःशाम एम. राळेभात, सचिव पदासाठी अँड.शिवाजी लटपटे, खजिनदार पदासाठी अँड.सागर मोरे हे विजयी झाले. तर ग्रंथपाल पदी अँड.एच.डी.सपकाळ व महिला सचिव पदा साठी अँड.वैश्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अँड.पाटील व्हि.वाय यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक म्हणुन अँड.नितीन घुमरे यांनी काम पाहिले.

सदरचे निवडणुकीत विजयी झालेले उमेदवारांचे अँड.कोल्हे, अँड.एस.आर.झरकर, अँड.शेख ए.के.,अँड. एन.एल.बोरा, अँड.प्रमोद राऊत, अँड.संगाम पोले, नगरसवेक सभापती अँड.प्रविण सानप, अँड.गणेश पाटील, अँड.चंद्रकांत ढाळे, अँड.एन.के.घुमरे, अँड. वराट, अँड.दिलीप वारे, अँड.टी.एस.पवार, अँड.सुभाष जायभाय, अँड.कात्रजकर, नगरसेवक, अँड.अरूण जाधव, अँड.काशिद, अँड.कोरे, अँड.गोले, अँड.पारे, अँड.अनिल काळे, अँड. वाळुंजकर, अँड. थोरात,अँड.अनिल बारवकर, अँड.एम.एन. नागरगोजे, अँड.कारंडे, इतर सर्व वकील बांधवांनी अभिनंदन केले.

अँड.हर्षल डोके या पुर्वीही दोन वेळा जामखेड वकील संघाचे निवडणुकीत निवडुण येवुन अध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले आहे व त्यांनी त्यांचे कार्यकाळात जामखेड न्यायालयाचे नविन ईमारतीचे कामासाठी सर्व वकीलांना बरोबर घेवुन मोठे योगदान दिलेले आहे तसेच जामखेड येथे वकील संघाचे वतीने मोठ मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत.त्यासाठी मा.ना.उच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांना देखील आमंत्रित केलेले होते.

त्यामुळे त्यांना सर्व जेश्ठ व कनिश्ठ वकीलांना बरोबर घेवुन काम करण्याचा अनुभव आहे व येथुन पुढे त्यांनी सर्व

जेष्ठ वकीलांचे मार्गदर्शनाखाली व तरूण वकीलांचे साथीने काम करण्याचे जामखेड न्युजशी बोलताना अँड.हर्शल एन.डोके पाटील नवनिर्वाचीत अध्यक्ष,
जामखेड तालुका वकील संघ यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!