प्रयागराज कुंभमेळ्यात भाविकांना काही अडचण आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन
भाविकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून जिल्ह्यातून भाविक दर्शना साठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जात आहेत.
महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या भाविक त्याठिकाणी अडकून पडल्यास वा त्यांना अडचणी येत असल्यास त्यांच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यवाही करण्याचे निर्देश मा. ना. डॉ. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा यांनी दिलेले आहेत.
त्यानुषंगाने नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पहिल्या मजल्यावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच तालुका स्तरावर संबंधीत तहसिलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कुंभमेळ्या साठी प्रयागराज येथे गेलेले जिल्ह्यातील भाविक अडकून पडल्यास किंवा काही अडचणीयेत असल्यास भाविकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे दूरध्वनीक्रमांक 0241 – 2323844, 2356940, टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा.
(राजेंद्रकुमार पाटील)निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहिल्यानगर