Home ताज्या बातम्या शुभम भारताचा तिरंगा नेपाळमध्ये फडकविण्यास सज्ज

शुभम भारताचा तिरंगा नेपाळमध्ये फडकविण्यास सज्ज

0
4

जामखेड न्युज—–

शुभम भारताचा तिरंगा नेपाळमध्ये फडकविण्यास सज्ज


जामखेडच्या शुभम हंबीरराव यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे तो नेपाळमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून आपला तिरंगा फडकाविण्यास सज्ज झाला आहे.

जामखेड तालुक्यातील युवा धावपटू शुभम हंबीरराव यांची “8 वी यूथ गेम्स इंडो-नेपाळ इंटरनॅशनल सिरीज 2026” या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अॅथलेटिक्सच्या 200 मीटर धाव या प्रकारात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.

ही स्पर्धा 22 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान पोखरा (नेपाळ) येथे होणार असून भारतासह विविध देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत शुभम यांनी दाखवलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारतीय युवा खेल परिषदेकडून त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीमुळे जामखेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला हा खेळाडू इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंना प्रवास, निवास, गणवेश, प्रमाणपत्र तसेच गुणवत्तेनुसार पदके आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. शुभम भारताचा तिरंगा नेपाळमध्ये फडकवण्यास सज्ज असून त्यांच्या पुढील यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!